लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : अवघ्या ४५ किमी ताशी वार्‍याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो तर, आपणही वाहून जाऊ, उडू किंवा पडू या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ अशी खोचक टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षपणे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपत्यारोप सुरू आहेत. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना हा पुतळा नौदलाने उभारलेला होता, असे म्हटले होते. तसेच ४५ किलोमीटर प्रती तशी एवढ्या जोरात वारा वाहत असल्याने त्यात तो पडला आणि त्याचे हे नुकसान झाले, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टिका केली आहे.

आणखी वाचा-अंबरनाथ गोळीबारातील दोन जण डोंबिवलीतील घारिवलीत अटक

गणेशोत्सवाच्या काळात चाकरमानी आणि पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट! अवघ्या ४५ किमी ताशी वार्‍याच्या वेगाने जर पुतळा पडू शकतो; तर, आपणही वाहून उडू किवा पडू या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ !! राज्य सरकारची नवीन “कोकणातून पर्यटक पळवा योजना” अशी खोचक टिका आव्हाड यांनी केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhads sharp criticism on the chief minister eknath shinde mrj