लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : राज्यातील विविध शक्तिपीठां मधील देवींचा भक्त असलेल्या ठाण्यातील एका नागरिकाने आपल्या दुचाकीवरून साडे तीन शक्तिपीठांचे ३४ तास ३७ मिनीटे ५६ सेकंदात अंतर पार करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. या प्रयत्नाबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Rishabh Pant attained a stellar milestone and surpassed his idol, MS Dhoni
Rishabh Pant : ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक झळकावत केला खास पराक्रम, महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागे
Prepaid rickshaw booth at Pune railway station closed due to traffic police
ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट! वाहतूक पोलिसांमुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रीपेड रिक्षा बूथ बंद
Virat Kohli run out after Matt Henry direct hit video viral IND vs NZ 3rd Test
Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO
IND vs PAK Hong Kong Super 6 Pakistan Beat India by 7 Wickets Robin Uthappa Manoj Tiwary
IND vs PAK: पाकिस्तानने ५ षटकांत भारताचा केला पराभव, एकही विकेट न गमावता गाठले १२० धावांचे लक्ष्य
apprenticeship at konkan railway
कोकण रेल्वेत अप्रेंटिसशिप
Daylight Saving Time
Daylight Saving Time : ‘डेलाइट सेव्हिंग टाइम’ म्हणजे काय? जगभरात का होते चर्चा? जाणून घ्या कारण!

अभिषेक विलास नलावडे ( ४१) या नागरिकाचे नाव आहे. ते एका खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. अभिषेक देवी भक्त आहेत. वेळ मिळेल तेव्हा ते आवर्जून राज्यासह देशाच्या विविध भागात असलेल्या देवीच्या मंदिरांना भेटी देतात. मागील काही महिन्यांपासून अभिषेक महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठे असलेल्या देवींच्या दर्शनाचा प्रवास जलदगतीने कसा पूर्ण करता येईल. या माध्यमातून आपली आव्हानात्मक पुस्तकात नोंद होईल यादृष्टीने विचार करत होते.

आणखी वाचा-ठाण्यातील श्रीनगरवासियांचा मुंबई प्रवास होणार कोंडीमुक्त, रस्ते रुंदीकरणासाठी पालिकेने उचलली पाऊले

या विचाराप्रमाणे अभिषेक यांनी कमीत कमी वेळात आपल्या रॉयल एनफिल्ड हिमालियन बीएस-३ या दुचाकीवरून साडे तीन शक्तिपीठांचा प्रवास करण्याचे नियोजन केले. ८ नोव्हेंबर रोजी आव्हानवीर अभिषेक यांनी आवश्यक भोजन, शयनाची आवश्यक सामग्री आपल्या वाहना सोबत घेऊन ठाणे येथून प्रवासाला सुरूवात केली. ठाणे येथून कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी, नांदेडची रेणुका माता, नाशिक वणीची सप्तशृंगी देवी असे दर्शन आणि स्थळांना भेटी देत अभिषेक पुन्हा ठाण्यात परतले आहेत.

त्यांनी साडे तीन शक्तिपीठांना भेटी देण्याचा कार्यक्रम ३४ तास ३७ मिनीटे ५६ सेकंदात पूर्ण केला आहे. भारतामधील सर्वात वेगवान आणि पहिली व्यक्ती म्हणून आपली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, असा दावा अभिषेक यांनी केला आहे. आपल्या शक्तिमान दुचाकी वाहनामुळे आपण हा प्रवास जलदगतीने पूर्ण केला आहे, असे अभिषेक नलावडे यांनी सांगितले.