लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकाला दिलासा देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर टेंभीनाका येथील आनंद आश्रमाबाहेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले तसेच अभिनंदन केले. शिवसेनेमध्ये गेल्यावर्षी जूनमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्यास सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने हंगामी स्थिगीत दिली होती. तत्त्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यास पाचारण केल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्तित्त्वात आले. सर्वोच्च न्यायालयाचे हंगामी आदेश, आमदारांची अपात्रता, राज्यपालांची भूमिका याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिल्याने शिंदे यांचे सरकार टिकल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात स्पष्ट झाले.

हेही वाचा… फलाट सोडून लोकल निघाली पुढे; विठ्ठलवाडी स्थानकातील घटना, प्रवाशांची तारांबळ

हा निकाल सकाळपासून ठाण्यातील शिंदे यांचे समर्थक पाहात होते. निकाल बाजूने लागताच त्यांनी टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे जल्लोष साजरा केला. तसेच पेढे भरवित एकमेकांचे अभिनंदन केले.

Story img Loader