ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात आरक्षित असलेल्या या नियोजीत रस्त्यांच्या विभागाची पहाणी नुकतीच कलयाणचे खासदार डॉ. श्रीकांत िशदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी जवळपास ५० हजार लोकवस्तीला वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरणारा कळवा – शिव-शक्तीनगर ते मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मध्य रेल्वेवरील कल्वर्टच्या (मोरी) कामाचा आढावाही घेण्यात आला. हे कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. कळवा पारसिकनगर ते रेल्वे क्रॉसिंगकडे असणाऱ्या शिव-शक्तीनगर, घोलाई नगर या परिसराची यावेळी पहाणी करण्यात आली. याच परिसरातील रेल्वे रूळाखाली दोन कल्वर्ट अस्तित्वात आहेत. पूर्वी या कल्वर्टमार्गे वाहतूक सुरू असायची, परंतु कालांतराने गाळ साचल्याने हे कल्वर्ट बंद झाले. कल्वर्टमधील साचलेला गाळ तातडीने काढण्यात यावा, तसेच लवकरात लवकर हे कल्वर्ट वाहतुकीसाठी खुले करावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
* विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सुमारे ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
* कळव्याच्या खाडीवर उड्डाणपुल उभारण्याचे काम मेसर्स जे.कुमार या प्रतिथयश कंपनीला देण्याची निविदाही मंजूर करण्यात आली.
* ठाणे आणि कळव्याला जोडणारे दोन उड्डाणपुल सध्या अस्तित्वात असून त्यापैकी एका पुलाचा वापर बंद आहे. त्यामुळे दुसऱ्या उड्डाणपुलावर वाहनांची प्रचंड गर्दी होते.
* ठाणे, नवी मुंबई असा टोलविरहीत प्रवास करायचा असेल तर कळवा-विटावामार्गे ठाणे-बेलापूर रस्त्यावरील प्रवास सोयीचा आहे. मात्र, कळवा उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी प्रवाशांना नकोशी होते. हे लक्षात घेऊन खाडीवरील नियोजीत उड्डाणपूल महत्वाचा मानला जात आहे. या उड्डाणपुलाचे काम मंजूर होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही.
* असे असतानाही याच उड्डाणपुलास वळसा घेऊन थेट नाशिक महामार्गावर पोहचता येईल, अशा रस्त्याची आखणी सुरू झाल्याने हा नियोजीत रस्ता प्रत्यक्षात उतरेल का, असा सवाल उपस्थित होत आहे.