पोलिसाला मारहाण करणाऱ्या एका गुन्हेगाराने पोलीस वाहनात बसून वाढदिवसाचा केक कापल्याने खळबळ उडाली आहे. केक कापत असताना बंदोबस्तावरील पोलिसांनी या घटनेला विरोध का केला नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांच्या वाहनात बसून उल्हासनगर मधील एक गुन्हेगार त्याच्या समर्थकांनी आणलेला केक कापत असल्याची दृश्यचित्रफित समाज माध्यमामावर आज (रविवार) सकाळ पासून प्रसारित झाली आहे. उल्हासनगर मधील रमेश झा आणि त्याच्या समर्थकाने पाच वर्षापूर्वी एका पोलिसाला मारहाण केली होती. याप्रकरणी उल्हानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन रमशे झा याला अटक झाली आहे. त्याच्यावर पोलिसांनी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. त्याला न्यायालयातील तारखेप्रमाणे सुनावण्यांसाठी पोलीस बंदोबस्तात आणले जाते.

अशाच एका सुनावणीला रमेश झाला आणले जात असताना त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता. त्यामुळे रमेशच्या समर्थकांनी रमेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक केक खरेदी करून तो रमेशला सुनावणीसाठी पोलिसांनी ज्या वाहनातून आणले त्या वाहनाच्या बाहेर थांबून खिडकीतून रमेशला केक कापण्यासाठी दिला. यावेळी पोलीस वाहनाच्या बाजुला असताना हा प्रकार घडला. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात गुन्हेगार वाढदिवस कसा काय साजरा करू शकतो? असा प्रश्न समाज माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan a criminal cut a birthday cake while sitting in a police vehicle msr