कल्याण : डोंबिवलीतील जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांना दोन वर्षापूर्वी यकृताचा कर्करोग झाला होता. त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी पुरेपुर वैद्यकीय उपचार होणे आवश्यक होते. परंतु, शिवाजीराव जोंधळे नियंत्रक असलेल्या विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गिता खरे (शिवाजीराव यांची दुसरी पत्नी) आणि त्यांचा खरे कुटुंबातील मुलगा, मुलगी, सून, जावई यांनी शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशातून त्यांना वेळोवेळी त्रास देऊन वैद्यकीय उपचार घेण्यापासून वंचित ठेवले. शिवाजीराव यांच्यावर कर्करोग आजारातून बरे होण्यासाठी यकृताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गिता खरे यांनी होऊन दिली नाही.

त्यामुळे आपल्या वडिलांच्या मृत्यूस गिता खरे कुटुंब कारणीभूत आहे. हा शिवाजीराव जोंधळे यांचा मुलगा सागर यांचा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथमदर्शनी मान्य करून गिता खरे यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश विष्णुनगर पोलिसांना दिले.
कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी सायली लम्भाते यांच्या आदेशावरून डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी सागर शिवाजीराव जोंधळे यांच्या तक्रारीवरून विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गिता खरे (शिवाजीराव यांची दुसरी पत्नी), वर्षा देशमुख (शिवाजीराव यांची मुलगी), प्रितम देशमुख (जावई), हर्षकुमार खरे (मुलगा), स्नेहा खरे (सून) यांच्या विरुध्द शनिवारी गुन्हा दाखल केला. न्यायालयाने खरे कुटुंबियांची बाजू ऐकून घेऊन हा आदेश दिला. मानसिक छळ करणे, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कट रचणे या भारतीय न्याय संहिता कलमाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
DY Chandrachud on euthanasia case
Ex CJI DY Chandrachud: शेवटच्या दिवशी न्या. चंद्रचूड यांचा महत्त्वाचा निकाल; मुलाच्या इच्छामरणाची मागणी करणाऱ्या पालकांना दिला दिलासा
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

हेही वाचा…छताचे प्लास्टर अंगावर पडून मुलाचा मृत्यू

पोलिसांनी सांगितले, शिवाजीराव यांना कायदेशीर विवाहाच्या वैशाली पत्नीपासून चार अपत्ये होती. समर्थ समाज या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद ते सांभाळत होते. या संस्थेत काही वर्षापूर्वी गिता खरे या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. गिता खरे यांच्या बरोबर शिवाजीराव यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित होऊन त्यांनी तिच्या बरोबर विवाह केला. त्यांना वर्षा खरे (देशमुख) हे अपत्य झाले. या प्रकाराने शिवाजीराव जोंधळे यांच्या कुटुंबीयांवर अन्याय झाला. शिवाजीराव यांनी स्वमिळकतीमधून आसनगावसह अनेक ठिकाणी जागा घेऊन तेथे शिक्षण संस्थेची उभारणी केली. गिता खरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीराव यांना ब्लॅकमेलिंग करून, जोंधळे कुटुंबीयांना अंधारात ठेऊन या सर्व मिळकती स्वत:च्या नावावर करून घेतल्या. या विषयावरून शिवाजीराव आणि मुलगा सागर यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाले.

जानेवारी २०२२ मध्ये शिवाजीराव यांना यकृताचा कर्करोग झाला. वितुष्ट दूर सारून मुलगा सागरने त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली. चेन्नई, मुंबई, डोंबिवलीतील रुग्णालयात शिवाजीराव यांच्यावर उपचार करण्यात आले. सागर यांची शिवाजीरावांबरोबरची जवळीक खरे कुटुंबीयांना आवडली नाही. सागरने वडिलांसाठी यकृत देण्याची तयारी केली. ती गिता खरे यांनी व्देषातून नाकारली. सागर व शिवाजीराव एक झाले तर आपणास शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करता येणार नाही म्हणून गिता खरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीराव यांना कर्करोगाच्या योग्य उपचारापासून वंचित ठेवले. खोटी कारणे डॉक्टरांना सांगून त्यांना उपचाराविना घरी डांबून ठेवले. या निष्काळजीपणातून शिवाजीराव यांचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला, असे सागर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा…धर्मांतराविरूद्ध उल्हासनगरात मोर्चा, मराठी मुलीच्या धर्मातर प्रकरणानंतर संघटना एकटवल्या

आपल्या वडिलांच्या मृ्त्यूस खरे कुटुंब जबाबदार असल्याने त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सागर यांनी पोलिसांकडे केली होती. राष्ट्रवादीच्या मुरबाडमधील एका नेत्याच्या हस्तक्षेपामुळे याप्रकरणाची चौकशी झाली नाही, असे सागर यांनी सांगितले. त्यामुळे कल्याण जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. खुनाच्या प्रकरणातील आरोपींना आंबेगाव जवळील शेतघरात आश्रय दिल्याने गिता खरे यांच्यावर यापूर्वी एक गुन्हा उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. अधिक माहितासाठी गिता खरे यांना संपर्क केला. त्यांचा मोबाईल बंद होता.