कल्याण – कसारा लोकलने प्रवास करत असताना चार जणांनी टिटवाळा ते वासिंद दरम्यान एका प्रवाशासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला होता. एप्रिल महिन्यात ही घटना घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. या प्रकरणातील दोन जणांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर त्यांना जामीन होऊन बाहेर आले होते. खुनाचा गुन्हा नोंद होताच या दोन जणांना पोलिसांनी पुन्हा पकडले होते. या प्रकरणातील एका मारेकऱ्याचा जामीन कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर. जी. वाघमारे यांनी फेटाळून लावला.

लोकलमध्ये प्रवाशाला मारहाण सुरू असताना एका जागरूक प्रवाशाने त्या मारहाणीची मोबाईलच्या माध्यमातून एक दृश्यचित्रफित तयार केली होती. ती चित्रफित समाज माध्यमांवर सामायिक केली होती. या समाज माध्यमांवरील चित्रफितीचा आधार घेऊन मारहाणीत गंभीर जखमी होऊन नंतर रुग्णालयात उपचार घेत असताना मृत झालेले दत्तात्रय भोईर यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. समाज माध्यमातील ही चित्रफित पोलिसांनी पाहिली. न्यायालयात मृताचे नातेवाईकाचे वकीलपत्र घेणाऱ्या ॲड. सागर कदम यांनी न्यायालयात दाखल केली. या चित्रफितीमुळे या घटनेला सबळ पुरावा मिळाला, असे मयताचे तक्रारदार नातेवाईक यांचे वकील ॲड. सागर कदम यांनी सांगितले.

Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल
youth murder due to love affair in beed
बीड : प्रेम संबंधातून बीड येथील युवकाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला

हेही वाचा >>>ठाणे पुर्व सॅटीस पुल मार्गिका जोडणीचे काम लवकरच, मार्गिका जोडणीसाठी रेल्वे घेणार दोन तासांचे १९ ब्लाॅक

गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय भोईर या प्रवाशाचा नंतर मृत्यू झाल्याने याप्रकरणातील मारेकरी तनुज जम्मुवाल यांच्यासह तीन जणांवर खुनाचे कलम प्राथमिक तपासणी अहवालात नंतर लावण्यात आले. जामिनावर बाहेर आलेल्या दोन संशयितांमधील मारेकरी तनुज व साथीदारावर खुनाचे कलम दाखल होताच पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर तनुजने जामिनासाठी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मयत प्रवाशाच्या तक्रारदार नातेवाईक यांचे वकील ॲड. सागर कदम यांनी गुन्हा दाखल मारेकऱ्याचे प्रकरण जामिनासाठी सुनावणीला आले. त्याला जोरदार हरकत घेतली. ॲड. कदम यांनी न्यायालयाला घडलेल्या घटनेची माहिती कथन केली. त्याच बरोबर जागरूक नागरिकाने तयार केलेल्या मारहाणीच्या दृश्यचित्रफितीची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर. जी. वाघमारे यांनीही दखल घेतली. दोन्ही बाजुंचे कथन एैकून न्यायालयाने मारेकरी तुनजचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणातील दोन जण अद्याप फरार आहेत.

एप्रिलमध्ये दत्तात्रय भोईर, प्रदीप शिरोसे आणि त्यांचे दोन सहकारी सीएसएमटी-कसारा लोकलने प्रवास करत होते. याच डब्यातून मारेकरी तुनज आणि त्यांचे तीन साथीदार प्रवास करत होते. हे दोन्ही गट दरवाजाजवळ उभे राहून गप्पा, हास्य करत प्रवास करत होते. मारेकऱ्यांचा गट आपल्याकडे पाहून हास्य करत असल्याने मयत दत्तात्रय भोईर आणि साथीदारांनी आमच्याकडे पाहून का हसता म्हणून समोरच्या गटाला प्रश्न केला. त्याचा राग येऊन मारेकऱ्यांनी भोईर यांच्यासह साथीदार प्रदीप शिरोसे यांना पट्ट्याने मारहाण केली. त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात भोईर, शिरोसे गंभीर जखमी झाले होते. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता.

Story img Loader