Kalyan Crime : कल्याणमध्ये काय चाललं आहे असा प्रश्नच समोर येणाऱ्या बातम्यांवरुन पडतो आहे. दोन दिवसांपूर्वीच एका परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला तुम्ही भिकारी आहात, तुम्ही मासळी खाता म्हणत मारहाण केली. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. ही घटना ताजी असतानाच एका परप्रांतीयाने आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पांडे असं या परप्रांतीयाचं आडनाव आहे. त्याच्या पत्नीनेही मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकी ही घटना काय घडली?

एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मराठी कुटुंबाने जाब विचारला त्यावेळी पांडे याने त्याच्या पत्नीने या मराठी कुटुंबाला मारहाण केली. या प्रकरणी पांडे पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडे पती पत्नीच्या या मारहाणीत एक मराठी तरुण जखमी झाला आहे. या तरुणीच्या पत्नीला आणि आईलाही या दोघांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये पांडे पती पत्नी हे मराठी कुटुंबाला कशी मारहाण करत आहेत ते दिसून येतं आहे.

पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीत दोन कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता. मुलांच्या खेळण्यावरुन हा वाद झाला. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला अशी तक्रार तिच्या आई वडिलांनी केली. आम्ही आई वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आई वडिलांनी जाब विचारला तेव्हा त्या परप्रांतीय कुटुंबाने मारहाण केली. पांडे पती पत्नीच्या विरोधात आम्ही तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी कल्याणमध्ये अशीच घटना

काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये अशाच प्रकारे मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तुम्ही मराठी माणसं घाण आहात, मटण मच्छी खाता असं म्हणत अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकाराने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, विरोधी पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतर संबंधित एमटीडीसीच्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.

कल्याणच्या अजमेरा सोसायटीतली घटना

एमटीडीसीमध्ये अधिकारी असलेला अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत एकमेकांचे शेजारी आहेत. दरम्यान, नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करत असाताना धूप लावत असतात. या धुपाचा धूर कळवीकट्टे यांच्या घरात जात असल्याने गीता यांच्या घरातील तीन वर्षाच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला दम लागतो. या धुराचा त्रास होतो असं सांगितलं. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता अशीच एक घटना समोर आली आहे.