कल्याण – तुम्ही तुमच्या मुलीचे माझ्या बरोबर लग्न लावून दिले नाही. मुलीच्या लग्नाला विरोध केला तर तुम्हाला जीवे ठार मारीन. तुमच्या मुलीला मी तुमच्या समक्ष उचलून घेऊन पळून जाईन, अशी धमकी एका तरुणाने कल्याणमधील खडेगोळवली भागातील एका महिलेला दिली आहे. या धमकीने या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भयभीत झालेल्या कुटुंबातील महिलेने याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपी तरुण यश म्हस्के याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तो भिवंडी येथील शांतीनगर भागात राहतो.

गेल्या तीन महिन्याच्या काळात हा सगळा प्रकार तक्रारदार महिलेच्या महाविद्यालयीन मुलीच्या बाबतीत घडला आहे. पीडित मुलगी आणि आरोपी तरुण एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. ते एकमेकांना ओळखतात. या परिचयातून पीडित मुलगी आणि आरोपी तरुण यांची घट्ट मैत्री झाली. आरोपी योगेश म्हस्के याने पीडित तरुणीबरोबर प्रेमभावनेतून काही छायाचित्रे काढली होती. यामध्ये अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्रे होती. योगेशने पीडित मुलीला लग्नाची गळ घातली. कुटुंबीयांच्या विरुद्ध आपण काहीही करणार नाही, असे सांगून पीडित मुलीने यशबरोबरचे संबंध तोडले होते. तरीही यश पीडित मुलगी महाविद्यालयात गेली की रस्त्यावरून जात असताना तिचा पाठलाग करून तिला भेटण्याचा प्रयत्न करायचा. पीडित मुलगी त्याला भेटण्यास नकार द्यायची. या गोष्टीचा राग आल्याने आरोपी योगेशने पीडित तरुणीबरोबर काढलेले काही प्रेमभावनेतील छायाचित्रे इन्स्टाग्रामवर सामायिक केली. या माध्यमातून पीडित तरुणीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडितेला समजला. तिने घरी हा प्रकार सांगितला. या प्रकाराने मुलीची आई संतप्त झाली. तरीही आरोपी योगेशने पीडित मुलीच्या आईची भेट घेतली. तुमच्या मुलीचे लग्न माझ्या बरोबर लावून दिले नाहीतर मी तुम्हाला जीवे ठार मारीन आणि तुमच्या मुलीला उचलून घेऊन पळून जाईन, अशी धमकी दिली.

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न
Kalyan citizens beat youths who molested a girl
कल्याणमध्ये चिंचपाडा येथे मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नागरिकांचा चोप
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे

हेही वाचा – डोंबिवलीजवळील निळजे गावात पिशवीत लघुशंका करून फळ विक्री

हेही वाचा – ठाणे : छताचे प्लास्टर कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

याप्रकाराने पीडित मुलीचे कुटुंब हादरले. योगेश टोकाची कोणतीही भूमिका घेऊ शकतो हे समजल्यावर पीडितेच्या आईने शनिवारी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या आदेशावरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Story img Loader