Kalyan Crime : कल्याणच्या खडकपाडा भागात अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत ही घटना ( Kalyan Crime ) घडली आहे. अखिलेश शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांना गुंड बोलवून मारलं आहे असा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत अभिजित देशमुख जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर मुंबईतल्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकी घटना काय घडली?
सरकारी नोकरी करणारे अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे योगीधाम सोसायटीत शेजारी राहतात. अखिलेश यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. धूप लावल्याने वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात हा धूर जातो, त्यांच्या घरात असलेल्या तीन वर्षांच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला दम लागतो. ही बाब वर्षा यांनी गीता यांना सांगितली. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या बाजूला राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. ज्याचा राग शुक्ला यांना आला आणि त्यांनी काही लोकांना बोलवून या दोघांना मारहाण ( Kalyan Crime ) केली. या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी काय सांगितलं?
कल्याणच्या खडकपाडा भागात योगीधाम परिरसरात अजमेरा सोसायटी आहे. त्या सोसायटीत अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या शेजारी राहणारे देशमुख यांच्या धूप लावण्यावरुन आणि त्याचा धूर एकमेकांच्या घरांमध्ये जातो म्हणून या दोघांमध्ये शिवीगाळ आणि मारहाण झाली. मारहाणीमध्ये देशमुख नावाचे गृहस्थ जखमी आहेत. या प्रकरणी पुढील तपास आम्ही करतो आहोत. देशमुख यांची तक्रार होती त्याप्रमाणे एफआयआर दाखल केली आहे. तसंच शुक्ला यांच्या तक्रारीवरुनही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. देशमुख जखमी आहेत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सोसायटीच्या काही तक्रारी आहेत, मारामारीचा गुन्हा ( Kalyan Crime ) दाखल आहे असं पोलिसांनी सांगितलं. शुक्ला हे सरकारी नोकरीवर आहेत ते काय काम करतात त्याची चौकशी करण्यात येते आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी ही माहिती दिली.
विजय कळवीकट्टे यांनी काय सांगितलं?
विजय कळवीकट्टे याच सोसायटीत राहतात, त्यांनी माध्यमांना सांगितलं, “मी माझ्या घरात बसलो होतो. त्यावेळी शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांची खोली काही माणसांना दाखवली ज्यानंतर त्यांनी सायकल उचलून दारात आपटली. मी काय झालं बघायला आलो तेव्हा त्यांनी अभिजित देशमुख यांना रॉडने सात ते आठ माणसांनी मारायला ( Kalyan Crime ) सुरुवात केली. मी अडवायला गेलो तर मलाही मारलं आणि बाजूला केलं. महिलांनाही मारहाण केली. तसंच मराठी माणसं भिकारी आहेत त्यांना मारा असंही ते शिवीगाळ करत म्हणत होते. अभिजित देशमुख यांना दहा ते बारा टाके पडले आहेत इतकं मारण्यात आलं आहे. तसंच ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.” या प्रकरणाची ( Kalyan Crime ) गंभीर दखल मनसेनेही घेतली आहे.
मनसेचे नेते उल्हास भोईर काय म्हणाले?
योगीधाम भागातल्या किरकोळ वादावरुन भांडणं ( Kalyan Crime ) झाली. शुक्ला आणि कळवीकट्टे कुटुंबात दिवा आणि धूप लावण्यावरुन वादावादी झाली. त्यांचा वाद सोडवण्यासाठी देशमुख गेले होते. त्यांना इतकं मारलं आहे की त्यांची प्रकृती गंभीर आहे. देशमुख कुटुंबासह आम्ही म्हणजेच मनसे उभी आहे. जर २४ तासांत या प्रकरणी आरोपींना अटक ( Kalyan Crime ) केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करणार असा इशारा उल्हास भोईर यांनी दिला आहे.