डोंबिवली एमआयडीसी परिसरात विजय पेपर मील या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाची हत्या झाली होती. या हत्येनंतर कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, रिक्षावर लावण्यात आलेल्या वेडिंगच्या बॅनरमुळे या हत्येच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अवघ्या १२ तासात अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे पालिका साथ नियंत्रणासाठी सज्ज ;साथीच्या आजारांबरोबरच करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

कंपनीतील सामान चोरीला गेल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी, असा संशय पोलिसांना होता. तपासाचा हाच धागा पकडत पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये त्यांना एक रिक्षा संशयास्पद आढळली. याच रिक्षावर एबीपी वेडिंगचे बॅनर होते. मानपाडा पोलिसांनी अवघ्या आठ तासात ही रिक्षा शोधून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी टोनी थॉमस डिसिल्वा उर्फ शिवा सोमा हीलंम याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेला दीड लाख किमतीचा मुद्देमाल तसेच रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. मयत सुरक्षा रक्षकाने चोरी करण्यात विरोध केल्याने आपल्या दोन साथीदारांसह त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करत त्याची हत्या केल्याची कबुली आरोपी टोनीने दिली आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये झाड अंगावर कोसळून आई-मुलगा जखमी

बिवली एमआयडीसी परिसरातील विजय पेपरमील या बंद असलेल्या कंपनीमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास सुरक्षारक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्ञानबहादुर गुरुम असं या मयत सुरक्षा रक्षकाचे नाव होते .मृतदेहाच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने प्रहार केल्याच्या खुणा होत्या. तसेच कंपनीतील भांगरतील सामानही चोरी झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

हेही वाचा >>> ठाणे : ॲट्रोसिटी प्रकरणात केतकी चितळेला जामीन

या घटनेचा मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका सीसीटीव्हीमध्ये बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास काही इसम एका रिक्षात काही सामान घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या रिक्षाचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता मात्र रिक्षावर एबीपी वेडिंगचे बॅनर लागलेले होते. पोलिसांचा या रिक्षांवर संशय बळावला. याच बॅनरच्या आधारे मानपाडा पोलिसांच्या पथकाने या रिक्षाचा शोध सुरू केला.

हेही वाचा >>> अश्लील Video च्या भितीने आत्महत्या : तिच्या आत्महत्येमागे श्रीमंत बिल्डरची दोन मुलं; रुपाली चाकणकर यांनी प्रकरणाची दखल घेत…

या परिसरातील सर्व रिक्षांची तपासणी करण्यात आली. या दरम्यान एका रिक्षावर सदरचा बॅनर कापलेला असल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळून आले. पोलिसांनीही रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षा ड्रायव्हरने पोलिसांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करत या रिक्षाचालकाला अखेर पकडले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने आपल्या दोन साथीदारांसह या सुरक्षारक्षकाची हत्या केल्याची कबुली दिली.

हेही वाचा >>> कळवा, मुंब्रा आणि शीळ भागातील जुने- नादुरूस्त विद्युत मीटर टप्प्याटप्प्याने बदलणार- टोरंट पॉवर

आरोपींनी सांगितल्यानुसार १५ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास टोनी उर्फ शिवा हा आपल्या दोन साथीदारांसह ऑटोरिक्षातून विजय पेपर मील कंपनीजवळ गेला होता. कंपनीत प्रवेश करत त्याने सामान चोरी करण्याचा प्रयत्न केला. याच वेळेस सुरक्षारक्षक ज्ञान बहादुर याला जाग आली. त्याने आरडाओरड करत या चोरीला विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या टोनी व त्याच्या दोन साथीदारांनी एका लोखंडी रॉडने ज्ञानबहादूरच्या डोक्यात मारून त्याची हत्या केल्याची केली. त्यानंतर या तिघांनी कंपनीमधील तांबे, पितळ व इतर भंगाराचे तुकडे असा तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

हेही वाचा >>> डोंबिवलीत भंगार चोरीसाठी केली चार जणांनी सुरक्षा रक्षकाची हत्या ;दोन भंगार चोर अटकेत

87 कंपन्या बंद मात्र कंपनीत सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक ठेवा

दरम्यान, डोंबिवली एमआयडीसी परिसरात तब्बल 87 कंपन्या या बंद अवस्थेत आहेत. बंद व भग्नावस्थेत उभा असलेला या कंपन्या सध्या गुन्हेगारीचा अड्डा ठरू लागल्या आहेत. या कंपन्यांच्या विस्तीर्ण आवारात अवघा एक सुरक्षारक्षक ठेवण्यात आलाय. कंपनी बंद असली तरीदेखील सुरक्षिततेसाठी कंपन्यांमध्ये सुरक्षारक्षक वाढवावेत, त्याचप्रमाणे कंपनी व कंपनीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा बस बसवावा जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाहीत, असे आवाहन डोंबिवली एसीपी सुनील कुराडे यांनी यावेळी केलंय.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan crime one accused arrested two absconding in murder of security guard prd