लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : पाच वर्ष आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ४१ वर्षाच्या वडिलांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. आर. अशतुरकर यांनी बाललैंगिक अत्याचार कायद्याने जन्मठेपेची आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

दंडाची रक्कम न्यायालयात जमा करुन ती पीडित मुलीच्या साहाय्यासाठी देण्यात यावी. तसेच शासनाच्या मनोधैर्य किंवा इतर योजनेतून मुलीला काही साहाय्यक मिळते का यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश शासकीय यंत्रणांना दिले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. कदम्बिनी खंडागळे यांनी मुलीच्यावतीने खंबीरपणे बाजू मांडली. टिटवाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी या प्रकरणाचा कसून तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा…. शिळफाटा येथे दोन गोदामांना आग

सरकारी वकील ॲड. खंडागळे यांनी न्यायालयाला सांगितले, आरोपी वडील, पत्नी आणि दोन मुले कल्याण जवळ राहत होते. पीडित मुलगी दोन वर्षाची असताना तिची आई वारली. मुलगी पाच वर्षाची झाल्यापासून आरोपी वडील मुलीवर लैंगिक अत्याचार करू लागले. मुलगी या प्रकाराला विरोध करत होती पण ते बळाचा वापर करत होते. हा प्रकार पीडित मुलगी १० वर्षाची होईपर्यंत पाच वर्ष सुरू होता. घडल्या प्रकाराने मुलीला खूप त्रास होत होता. ती कोणाला काही सांगू शकत नव्हती.

हेही वाचा…. डोंबिवलीत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर हल्ला.

एक दिवस मुलीने धाडस करुन पोलीस ठाणे गाठले पण त्यापूर्वीच वडिलांनी तिची समजूत घालून घरी आणले. त्यानंतरही तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच होते. नोव्हेंबर २०१६ मध्ये पोटदुखीने हैराण झालेली मुलगी अस्वस्थ होती. तिने वडिलांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. एक दिवस वडील घरात नाहीत पाहून तिने थेट टिटवाळा पोलीस ठाणे गाठले. तत्कालीन पोलीस वरिष्ठ निरीक्षक आंधळे यांनी तात्काळ मुलीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन घेतला. वडिलांना अटक केली. मुलीच्या वैद्यकीय तपासण्यांसाठी तिला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यापासून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आरोपपत्र कल्याण न्यायालयात दाखल केले.

सात वर्ष हे प्रकरण कल्याण जिल्हा न्यायालयात सुरू होते. न्या. अशतुरकर यांनी आरोपी वडिलांनी मुलीबाबत केलेला प्रकार हा घृणास्पद आहे. त्यामुळे कठोरात कठोरातील जन्मठेप याच शिक्षेसाठी ते पात्र आहेत. नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत त्यांनीही शिक्षा भोगायची आहे, असा निर्णय दिला.