कल्याण: मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकातील गृह फलाटाचे काम (होम प्लॅटफाॅर्म) गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटना तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दिवा रेल्वे स्थानकात गेल्या वर्षभरापासून गृह फलाटाची (होम प्लॅटफाॅर्म) बांधणी करण्यात येत आहे. दिवा रेल्वे स्थानकातील पश्चिम बाजूला हा फलाट आहे. या फलाटाची बांधणी करण्यापूर्वी रेल्वेने या जागेची मोजणी करून फलाट बांधण्यात येत असलेली जागा रेल्वेची असल्याचे नक्की केले होते. या फलाटाची बहुतांशी बांधणी झाल्यानंतर दिवा गावातील एका ग्रामस्थाने या फलाटाची कल्याण बाजूकडील काही जमीन आपल्या मालकी हक्काची असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडे केला. या जागेचा मोबदला दिल्या शिवाय आपण याठिकाणी फलाटाची बांधणी करून देणार नाही, अशी अडवणुकीची भूमिका घेतली.

दिवा रेल्वे स्थानकातील गृह फलाटाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. लोकलचे सहा डबे उभे राहतील एवढ्या जागेत फलाटाची बांधणी सुरू असताना खासगी जमीन मालकाने हरकत घेतली. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना ते काम आता वर्ष होत आले तरी पूर्ण करता आले नाही. फलाटाची जागा ही रेल्वेच्या मालकीची आहे अशी ठाम भूमिका रेल्वे अधिकाऱ्यांंनी घेतली आहे. तर जमीन मालक ती जागा आपल्या मालकीची आहे असा दावा करून आहे. या वादात दिवा रेल्वे स्थानकातील गृहफलाटाचे काम रखडले आहे.

Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Municipal Corporation Election, Pimpri Chinchwad ,
पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?
thane fire breaks out in laundry shop
ठाण्यात मदत यंत्रणेच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना, इमारतमधील लॉन्ड्री दुकानात आग लागल्याने सर्वत्र पसरला होता धूर
shivsena marathi news
पुण्यात भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या दोन्ही गटांत अस्वस्थता
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
maharera pune latest news in marathi
‘महारेरा’चा दणका! पुण्यातील ४८७ गृहप्रकल्पांना स्थगिती
Three generations of 74 Panvel tribal families remain homeless
तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर आदिवासी हक्काच्या घरापासून वंचित, पनवेलच्या विकास आराखड्यातील हरकतीवर सुनावणी

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियासह स्वाईन फ्ल्यूची साथ; ठाणे शहरात स्वाईन फ्ल्यूचे १३१ रुग्ण

या रखडलेल्या फलाटाच्या एका बाजुने प्रवासी उतरतात. हा फलाट बांधून पूर्ण झाला असता तर या फलाटाच्या दोन्ही बाजुने प्रवाशांना उतरता आले असते. सध्या सहा डबे सोडून उर्वरित लोकल डब्यातील प्रवासी रखडलेल्या फलाटाच्या दो्न्ही बाजुने उतरतात. सहा डबे असलेल्या भागात फलाटाचे बांधकाम रखडले असले तरी अनेक प्रवासी लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी रखडलेल्या फलाटाच्या बाजुने लोकलमध्ये चढतात आणि उतरतात. यामुळे प्रवाशांचा अपघात होण्याची भीती आहे. अनेक वेळा अशी जोखीम घेऊन लोकलमध्ये चढणारे, उतरणारे प्रवासी पडून जखमी होतात, असे प्रवाशांनी सांगितले. दिवा रेल्वे स्थानकातील प्रवासी संंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रखडलेल्या फलाट भागातील जमिनीचा वाद मिटवण्याचे काम सुरू आहे. त्यानंंतर रखडलेल्या फलाटाचे काम पूर्ण केले जाईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader