कल्याण: मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकातील गृह फलाटाचे काम (होम प्लॅटफाॅर्म) गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटना तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दिवा रेल्वे स्थानकात गेल्या वर्षभरापासून गृह फलाटाची (होम प्लॅटफाॅर्म) बांधणी करण्यात येत आहे. दिवा रेल्वे स्थानकातील पश्चिम बाजूला हा फलाट आहे. या फलाटाची बांधणी करण्यापूर्वी रेल्वेने या जागेची मोजणी करून फलाट बांधण्यात येत असलेली जागा रेल्वेची असल्याचे नक्की केले होते. या फलाटाची बहुतांशी बांधणी झाल्यानंतर दिवा गावातील एका ग्रामस्थाने या फलाटाची कल्याण बाजूकडील काही जमीन आपल्या मालकी हक्काची असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडे केला. या जागेचा मोबदला दिल्या शिवाय आपण याठिकाणी फलाटाची बांधणी करून देणार नाही, अशी अडवणुकीची भूमिका घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा