कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार आणि परवाना विभागातील लिपिक प्रकाश काशिनाथ धिवर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दीड लाख रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार हे पालिका हद्दीत मटण विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायाचा परवाना अर्ज स्वीकृत करण्यासाठी आणि परवाना हस्तांतरित करण्यासाठी मदत म्हणून बाजार व परवाना विभागातील लिपिक प्रकाश धिवर यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वत:साठी आणि वरिष्ठांसाठी दोन लाख रूपये लाचेची मागणी केली होती. एवढी रक्कम देणे तक्रारदारास शक्य नसल्यामुळे तडजोडी अंती ही रक्कम एक लाख ५० हजार स्वीकारण्याचे लिपिक धिवर यांनी मान्य केले. परवाना अधिकृत असताना बाजार व परवाना विभागातील कर्मचारी आपल्याकडे मोठी लाच मागत असल्याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणी कारवाईत धिवर हे लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालिकेत सापळा लावला होता. तक्रारदाराकडून दीड लाख रूपये घेताना लिपिक प्रकाश धिवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणात वरिष्ठांचा उल्लेख झाला असल्याने याप्रकरणाची चौकशी करून पथकाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 
Protesters demand that Vishalgad should be cleared of encroachments and dargah should be removed
विशाळगड अतिक्रमणमुक्त करत दर्गा हटवा; आंदोलकांची मागणी
pimpri chinchwad police commissioner vinay kumar choubey on illegal money lending
पिंपरी : अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश
Anti plastic campaign Mumbai Municipal Administration seizes 61 kg of plastic in a single day Mumbai news
प्लास्टिक विरोधी मोहीम पुन्हा एकदा तीव्र,एकाच दिवसात ६१ किलो प्लास्टिक जप्त, १ लाख ४५ रुपयांचा दंड वसूल
Maharashtra Pollution Control Board takes action due to noise pollution caused by Reliance Jio company office 
बड्या दूरसंचार कंपनीला दणका; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल
Housing sector in crisis due to environmental regulations CREDAI pune news
पर्यावरण नियमांमुळे गृहनिर्माण क्षेत्राची कोंडी! नियामक संस्थाकडून वाढलेल्या कारवाईवर ‘क्रेडाई’चे बोट
Story img Loader