कल्याण : कल्याण डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्यासाठी घनकचरा विभागाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. यापुढे नागरिकांनी कचरा ओला, सुका करुन न ठेवल्यास, दुकानदार, फेरीवाल्यांनी उघड्यावर कचरा फेकल्यास त्यांच्यावर पाच हजार रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

कचरा निर्मूलनासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देऊनही अनेक रहिवासी, दुकानदार उघड्यावर कचरा फेकणे, ओला, सुका कचऱ्याचे विलगीकरण न करणे असे प्रकार करत आहेत. दुकानदार प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या वापरास बंदी असताना चोरुन लपून दुकानात अशा पिशव्यांचा वापर करुन पालिकेच्या आदेशाचा भंग करत आहेत. फेरीवाले व्यवसाय केल्यानंतर रस्त्यावरच कचरा टाकून देत आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून घाण करणाऱ्या नागरिक, दुकानदार, फेरीवाल्यांवर आक्रमक दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. घनकचरा विभागातील कर्मचारी शहराच्या विविध भागात गस्त घालून सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर नजर ठेऊन आहेत. घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दंडात्मक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे.

vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
Pune Drunk drivers, proposal to suspend licenses,
पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

हेही वाचा… ठाणे: चोरट्यांकडून एकाची पाचव्या मजल्यावरून धक्का देऊन हत्या; पोलिसांकडून आरोपीला अटक

चाळी, झोपडी भागात घंटागाड्या

कचरा निर्मूनलासाठी शहराच्या चाळी, झोपड्या, नागरी वस्ती, बाजारपेठांमध्ये विशिष्ट वेळेत कचरा उचलण्यासाठी पालिकेने घंटागाडी सुरू केल्या आहेत. रहिवाशांनी, व्यापाऱ्यांनी पालिकेने ठरविलेल्या वाराप्रमाणे या वाहनामध्ये ओला, सुका कचरा जमा करायचा आहे. एवढी सुविधा दारात उपलब्ध असताना अनेक नागरिक रस्त्यावर, चौकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकतात. आता अशा नागरिकांवर आक्रमक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा… कोपरी रेल्वे पूल प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस

दुकानदारांना दंड

कल्याण मध्ये क प्रभागात उपायुक्त अतुल पाटील, क प्रभाग साहाय्यक आयुक्त संजय कुमावत, स्वच्छता अधिकारी संदीप खिस्मतराव यांनी प्रभागातील बाजारपेठेत पाहणी केली. त्यांना मोहिंदरिसंग काबुलसिंग रस्त्यावर मल्हार संकुलातील सॅमसंग सर्व्हिस दुकानाच्या बाहेर वस्तू वेष्टनाचे थर्माकोलचे ढीग दिसले. थर्माकोलची वेळीच विल्हेवाट न लावल्याने दुकानदाराला तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कल्याण मधील शमसूद जामन रसवंती गृहाच्या चालकाने ओला, सुका कचरा विलग न केल्याने त्यांना ३०० रुपये दंड ठोठावण्यात आला. अंबिका स्वीट दुकानात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. या दुकानाच्या मालकाला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

हेही वाचा… आनंदनगर सबवेचे गर्डर बसविण्याचे काम पूर्ण; ठाण्यातील वाहतूक सुरळीत

मोहिंदरसिंग काबुलसिंग शाळा रस्त्यावरील १०५ दुकानांच्या बाहेर ओला, सुका कचरा संकलनासाठी पालिकेने डबे ठेवले आहेत. या डब्यांमध्ये दुकानदारांनी कचरा टाकावा किंवा घंटा गाडीचा वापर करावा. उघड्यावर कचरा टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा घनकचरा विभागाने दिला आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटणार की चिघळणार; जाणून घ्या प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर!

डोंबिवली पूर्वेतील ग प्रभाग हद्दीतील साहाय्यक आयुक्त संजय साबळे, पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांच्या पथकाने प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या, ओला, सुका कचऱ्यासाठी दुकानासमोर डबे न ठेवणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. या दुकानदारांकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ह प्रभाग हद्दीत साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी २० दुकानांची तपासणी करुन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या दुकानदारांकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

” शुन्य कचरा मोहीम यशस्वी करण्यासाठी घनकचरा विभाग अनेक उपक्रम राबवित आहे. नागरिक, दुकानदारांनी या उपक्रमांना सहकार्य करुन देऊन स्वताची दंडात्मक कारवाईपासून मुक्तता करावी.” – अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग