कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांना अधिकाधिक नागरी सेवा ऑनलाईन (ई गव्हर्नन्स प्रणाली) माध्यमातून उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासनाने महत्वाची भूमिक बजावली आहे. या प्रशासकीय सेवेबद्दल पालिकेला स्काॅच संस्थेतर्फे महापालिका सुवर्ण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शनिवारी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी स्काॅच संस्थेचे अध्यक्ष समीर कोचर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पालिका मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन २०२२ पासून कल्याण डोंबिवली पालिका ई गव्हर्नन्स प्रणालीतून नागरिकांना नागरी सुविधा देत आहे. अशाप्रकारची सुविधा देणारी कल्याण डोंबिवली पालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली होती. माजी आयुक्त श्रीकांत सिंग यांच्या संकल्पनेतून ही प्रणाली पालिकेत राबिण्यात आली होती. गतिमान आणि पारदर्शक प्रशासनासाठी ही प्रणाली ओळखली जाते. ऑनलाईन प्रणालीतून नागरिकांना अधिकाधिक सेवा देत असल्याने पालिकेला यापूर्वी २००४, २०११ मध्ये स्काॅच संस्थेतर्फे पुरस्कार देण्यात आले होते.

आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी ही सेवा अधिकाधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम पध्दतीने या सेवा मिळत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा सुधारण्यात पालिकेने मोठी भरारी घेतली आहे. या तंत्रज्ञानामुळे महसूल वाढ, नागरिकांना घरबसल्या कर भरणा, अर्ज करण्याची, सेवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिजिटल पेमेंट पध्दतीने महसुलात वाढ झाली आहे. पारदर्शकतेसाठी कर्मचाऱ्यांचा स्थायी हस्तक्षेप कमी करून स्वयंचलित डिजिटल पध्दतीने नागरिकांना आपली कामे करता येतील यावर भर देण्यात आला आहे. महापालिकेचे मागील ३० वर्षातील महासभेचे निर्णय, ठराव ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पालिकेच्या सर्व सेवांची माहिती ऑनलाईन माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून अधिकाधिक नागरी सेवा देणारी कल्याण डोंबिवली पालिका अव्वल ठरल्याने स्काॅच संस्थेतर्फे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ई गव्हर्नन्स प्रणालीचा महापालिका सुवर्ण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सन्मानामुळे नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेवा आणि प्रशासकीय सुधारणा यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. हा पुरस्कार कर्मचारी, अधिकाऱ्यांनी, तांत्रिक गटाने केलेल्या समर्पित भावाच्या सांघिक कामाचे प्रतीक आहे, असे डाॅ. जाखड यांनी सांगितले.

ई गव्हर्नन्स प्रणालीचा हा पुरस्कार पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समर्पित, अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे. डिजिटल, स्मार्ट सेवांच्या माध्यमातून पालिका अधिक सेवा देत आहे या पुरस्कारामुळे अधोरित झाले आहे. शहरातील नागरिकांना अधिकाधिक या सेवा अधिक तत्परतेने देण्याचा पालिकेचा यापुढेही प्रयत्न असेल. – डॉ. इंदुराणी जाखड, आयुक्त.