जाणून घ्या किती बोनस जाहीर झाला आहे..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण- कल्याण डोंबिवली पालिकेच्या कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय शुक्रवारी प्रशासनाने म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत जाहीर केला. दिवाळीपूर्वी बोनस कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांना सुमारे २२ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी म्युनसिपल कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळ हरदास, सरचिटणीस रवी पाटील यांनी पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे गेल्या आठवड्यात केली होती. मागील दोन वर्षात करोना महासाथीवर झालेला खर्च आणि पालिकेची आर्थिक परिस्थिती विचार करुन कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने कर्मचारी संघटनेला दिले होते.

हेही वाचा >>> कोपरी पूलावर तुळई बसविण्यासाठी एक मार्गिका बंद; ठाण्यात मोठ्या कोंडीची शक्यता

हेही वाचा >>> बदलापूर : रिक्षा, जीप चालकांच्या बेकायदा थांब्याकडे वाहतूक पोलिसांचा कानाडोळा; वाहनांच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त

म्युनसिपल कर्मचारी कामगार संघटनेचे पदाधिकारी बाळ हरदास, रवी पाटील, सुरेश तेलवणे, अजय पवार, सुनील पवार इतर पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांची दिवाळी बोनस जाहीर करणेसंदर्भात भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, परिवहन कर्मचारी संघटनेचे शरद जाधव, गुलाब पाटील, संदीप दलाल, मोहन कामत, श्रीपाद लोखंडे उपस्थित होते. संघटनेने वाढीव बोनस देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. यावेळी आयुक्त, मुख्य व लेखा वित्त अधिकारी पालिकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती संघटना पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांना १६ हजार ५०० रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता चालूवर्षी दिवाळी बोनस जाहीर होती की नाही अशी शंका कर्मचाऱ्यांना होती. बोनस जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipality employees diwali each employee bonus ysh