कल्याण – दिवाळी सणाच्या खरेदीसाठी कुटुंबीयांसह बाहेर पडलेले नागरिक, त्यांची बाजारपेठेत आणलेली आणि रस्तोरस्ती उभी केलेली वाहने. याचवेळी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या गर्दीचा लाभ उठविण्यासाठी उमेदवारांकडून काढण्यात आलेल्या प्रचार मिरवणुका. या खरेदीचा उत्साह आणि प्रचार मिरवणुकांमुळे दोन दिवसांपासून दररोज संध्याकाळी चार वाजल्यापासून कल्याण, डोंबिवली शहरे वाहन कोंडीत अडकत आहेत.

या कोंडीचा सर्वाधिक फटका संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला बसत आहे. अनेक रिक्षा चालक संध्याकाळच्या कोंडीमुळे त्रस्त आहेत. या वाहन कोंडीमुळे अधिकच्या प्रवासी फेऱ्या मारणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक रिक्षा चालक सकाळ ते संध्याकाळी प्रवासी फेऱ्या मारून संध्याकाळी पाच नंतर वाहन कोंडीचा त्रास नको म्हणून रिक्षा बंद ठेवणे पसंत करत आहेत. या बंदचा प्रवाशांना फटका बसत आहे. कामावरून परतल्यावर अलीकडे रिक्षा वाहनतळावर रिक्षा नसल्याने प्रवाशांना रिक्षेची वाट पाहत बसावी लागते. एक रिक्षा आली तर त्यामागे १० ते १५ प्रवासी धावतआहेत. डोंबिवलीतून काटई, पलावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल सुरू आहेत.

vehicle got stuck on the railway track due to gravel stone at mothagaon village in dombivli
डोंबिवली मोठागाव रेल्वे फाटकात खडी टाकल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले, दुचाकी स्वारांची सर्वाधिक अडचण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
passenger was robbed by thieves on the skywalk of Kalyan railway station
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर प्रवाशाला चोरट्यांनी लुटले
Jitendra Awhad fights with NCP-SCP Leader Yunus Shaikh ani
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड शरद पवार गटातील नेत्याशी भिडले, माध्यमांसमोर हमरीतुमरी; अंतर्गत वाद चव्हाट्यावर, VIDEO व्हायरल
youth crowd at mankoli bridge to burst crackers
डोंबिवलीतील माणकोली पुलावर दिवाळीचा आखाडा; फटाके फोडण्यासाठी तरूणाईची गर्दी
Dombivli water to Thane, Conspiracy, eknath shinde news, eknath shinde latest news,
डोंबिवलीचे पाणी छुप्या पद्धतीने ठाण्याला पळविण्याचे षडयंत्र, मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री पिता-पुत्रावर घणाघात
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा >>>कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर प्रवाशाला चोरट्यांनी लुटले

डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात सुसज्ज वाहनतळ नाही. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले नागरिक रस्त्याच्या दुतर्फा मोटार, दुचाकी उभी करून खरेदीसाठी बाजारात जात आहेत. रस्त्याच्या कडेची ही वाहने वाहतुकीला मोठा अडथळा येत आहेत.

कल्याण, डोंबिवलीत रस्तोरस्ती पालिकेच्या परवानग्या न घेता, राजकीय मंडळींच्या समर्थकांनी फटाके विक्रीची दुकाने सुरू केली आहेत. या दुकानांच्या मंडपांचे कोपरे अनेक ठिकाणी चौक, रस्त्याला अडथळा येत आहेत. या फटाके विक्रीच्या दुकानदारांना रिक्षा चालक, प्रवासी काही बोलला तर ते त्याला दादागिरी करत असल्याच्या तक्रारी आहेत. बहुतांशी फटाके विक्रेते राजकीय मंडळींचे समर्थक असल्याने पालिका अधिकाऱ्यांना अशा विक्रेत्यांवर कारवाई करताना दबावामुळे हात आखडता घ्यावा लागत आहे.

हेही वाचा >>>भाजपचे नेते उमेदवारीसाठी शिंदे सेनेत

डोंबिवलीतील कोंडीवर आठ दिवसात उपाययोजना करा, असे आदेश वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी डोंंबिवली वाहतूक विभागाला दिले आहेत. वाहनांची संख्या दामदुप्पट, अरूंद रस्ते, वाहतुक पोलिसांचे कमी मनुष्यबळ त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहन कोंडी सोडविताना कसरत करावी लागत आहे.

कल्याण पश्चिमेतील महमद अली रस्ता, शिवाजी चौक परिसर विक्रेत्यांनी गजबजून गेला आहे. त्यात रस्त्यावरील वाहनांची वर्दळ भर घालते. त्यामुळे शिवाजी चौक, सहजानंद चौक परिसर सकाळपासून वाहन कोंडीत अडकलेला असतो. कल्याणमध्ये मुरबाड, शहापूर भागातून वाहने घेऊन किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येतात. ही वाहने दुकानांसमोर उभी करून व्यापारी खरेदी करतात. त्यामुळे ही वाहने कोंडीत मोठी भर घालतात. या सततच्या वाहन कोंडीमुळे अनेक रिक्षा चालकांना पाठदुखी, तणावाचे आजार झाले आहेत.

Story img Loader