कल्याण : कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील चार विधानसभा हद्दींमध्ये निवडणूक आयोगाची भरारी पथके आणि स्थिर सर्वेक्षण विभागाकडून तीन पाळ्यांमध्ये कल्याण, डोंबिवलीत शहराबाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक आयोगाच्या उपयोजनवर येणाऱ्या तक्रारी आणि आचारसंहितेचे पालन या पध्दतीने ही कारवाई केली जात आहे. कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये येणारे मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक, उड्डाण पूल भागात ही तपासणी केली जात आहे. शिळफाटा रस्ता, पत्रीपूल, ९० फुटी रस्ता, माणकोली पूल, शहाड उ्डाण पूल, दुर्गाडी किल्ला चौक, आधारवाडी तुरुंग, गांधारे पूल, तिसगाव नाका, मानपाडा रस्ता, कोपर उड्डाण पूल, कस्तुरी प्लाझा अशी शहराच्या चारही बाजुने तीन पाळ्यांमध्ये भरारी पथके काम करत आहेत.

हेही वाचा…कारच्या छतावरून फटाक्यांची आतषबाजी, ठाण्यात गंभीर प्रकार, चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

u

वाहनांमध्ये अधिकची रक्कम, मद्याच्या बाटल्या किंवा मतदारांना आमिष दाखविण्यासाठीच्या वस्तू आहेत का या पध्दतीने ही तपासणी केली जाते, अशी माहिती भरारी पथकातील एका अधिकाऱ्याने दिली. एखाद्या वाहनात अधिकची रक्कम सापडली. त्या रकमेचे त्याने व्यवस्थित पुरावे दिले तर वरिष्ठांना याबाबतची माहिती देऊन असे वाहन पंचनामा करून सोडून दिले जाते. तपासणी पथकासोबत पोलीस तैनात असतात.

हेही वाचा…आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीकाहेही वाचा…

निवडणूक काळात उल्हासनगर, भिवंडी परिसरातून मद्याच्या बाटल्या रात्रीच्या वेळेत वाहनांमधून शहरात आणण्याची यापूर्वीची पध्दत होती. या कसून तपासणी मोहिमेमुळे हे प्रकार काही प्रमाणात थंडावले आहेत. तपासणी पथकांनी अत्यावश्यक सेवेतील दूध, खाद्य पदार्थ विक्री, कोबंड्या पुरवठा (पोल्ट्री), मालवाहू वाहनांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. निवडणूक काळात काही राजकीय मंडळींकडून अशा वाहनांचा गैरवापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कल्याण, डोंबिवली विधानसभा मतदारसंघांमध्ये तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli vehicles coming in and out of city are being checked thoroughly sud 02