कल्याण : कल्याण पूर्वेतील महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज गुरूवारी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेनेतील नाराज गटाने महायुतीच्या या मिरवणुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. गोळीबार प्रकरणामुळे भाजपचे कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड तुरूंगात आहेत. त्यामुळे यावेळी भाजपने त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार असल्याचे वातावरण भाजपने बुधवारी निर्माण केले होते. पण व्यस्ततेमुळे तेही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येऊ शकले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपील पाटील, आमदार कुमार आयलानी, रिपब्लिकन पक्षाचे अण्णा रोकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका माधुरी काळे सहभागी झाले होते.

Campaigning of candidates taking advantage of Sunday holiday in Vasai Nalasopara vasai news
रविवार ठरला प्रचार वार; वसई, नालासोपाऱ्यात रविवारच्या सुट्टीची संधी साधत उमेदवारांचा जोरदार प्रचार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Yogi Adityanath, Yogi Adityanath comment on Mallikarjun Kharge, Mallikarjun Kharge,
‘बटेंगे तो कटेंगे यासाठी म्हणतो’, मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची स्पष्टोक्ती, ‘रझाकारांच्या अत्‍याचारांवर..’
BJP leader former MP Navneet Ranas campaign vehicle get viral in Amravati
नवनीत राणा म्‍हणतात, “…त्या नेत्यांचा हिशेब करा”, प्रचार वाहनाची जोरदार चर्चा
Shoe necklace to BJP MLA Krishna Gajbe image due to Zendepar iron mine issue
भाजप आमदारांच्या प्रतिमेला चपलांचा हार, झेंडेपार लोह खाणीचा मुद्दा तापला
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

हेही वाचा : अर्ज दाखल करण्यापूर्वी आनंद दिघे यांच्या स्मारकासमोर मनसे नेते अविनाश जाधव नतमस्तक

तिसगाव नाका येथील आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई हाऊस येथून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. मिरवणुकीत चित्ररथ, ढोल-ताशा, कर्णकर्कश वाद्ये यांचा समावेश होता. महायुती आणि सुलभा गायकवाड यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सजविलेल्या रथामधून उमेदवार सुलभा गायकवाड, मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, सुलभा गायकवाड यांचे कुटुंबीय उपस्थितांना अभिवादन करत होते.

शिवसेनेतील स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी या मिरवणुकीकडे पाठ फिरवली होती. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कल्याण पूर्वेत आणून महायुतीमधील नाराजांना सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला जाणार होता. पण, या नाराजांवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची पूर्ण नजर राहणार असल्याची चर्चा आहे. मिरवणुकीच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा : डोंबिवली आयरेतील बेकायदा साई रेसिडेन्सी जमीनदोस्त

अनेक वर्ष कल्याण पूर्वेतील निवडणूक शिवसेना-भाजप युतीमधून लढवत आहेत. आमदार गणपत गायकवाड यांचा दांडगा जनसंपर्क येथे आहे. अनेक विकास कामे या भागात त्यांनी केली आहेत. तोच विकासाचा अजेंडा समोर ठेऊन सुलभा गायकवाड या निवडणूक लढवित आहेत. त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल.

रवींद्र चव्हाण (भाजप नेते)