लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: येथील पूर्व भागातील पुना लिंक रस्त्यावर एका बंदिस्त गटारातील सांडपाणी मागील काही दिवसांपासून रस्त्यावर वाहत आहे. या भागात धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह भाविकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.

प्रभाग जे अंतर्गत गटारे तसेच नालेसफाईची कामे ठेकेदाराने योग्यरितीने केली नसल्याचे जागोजागी दिसते. याविषयी पालिकेकडे तक्रारी करुनही उपयोग होत नाही. ठेकेदार मनमानीने काम करत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. नूतन ज्ञान मंदिर शाळा ते गजानन महाराज मंदिरा दरम्यान बंदिस्त गटारातील सांडपाणी रस्त्यावर वाहून येत आहे. या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे या भागातील व्यापारी, रहिवासी, आणि मंदिरात येणारे भाविक हैराण आहेत.

हेही वाचा… ठाणे भाजपमधील सुंदोपसंदी वाढली

प्रसाद हाॅटेल ते सुजल मेडिकल दरम्यानच्या बंदिस्त गटाराखालील गाळ काढण्यात आला. परंतु, दोन चेंबरच्या मध्ये असलेला गाळ काढण्यात कुचराई करण्यात आली आहे, असे रहिवाशांनी सांगितले. बंदिस्त गटारांची १० फुटावर असलेली झाकणे काढून झाकणांच्या चार ते पाच फुट अंतरापर्यंतची गटार सफाई केली जाते. गटाराच्या उर्वरित भागातील गाळ, कचऱ्याची यंत्रणा पालिकेकडे नाही. त्यामुळे गटारे गाळाने भरलेली राहतात. ज्या ठेकेदारांकडे बंदिस्त गटारे आरपार साफ करण्याची यंत्रणा आहे. त्यांना पालिकेतील गटार सफाईची कामे मिळणार नाहीत अशी व्यवस्था काही मातब्बर राजकीय आशीर्वादाचे ठेकेदार करतात, अशा तक्रारी आहेत.

हेही वाचा… ३७ लाख रुपयांच्या वीज चोरी प्रकरणी टोरंट पाॅवर कंपनीकडून गुन्हे दाखल

गटार सफाईची जुजुबी कामे करायची आणि पूर्ण कामे केल्याची देयके काढायची ही वर्षानुवर्षाची पध्दत यावेळीही ठेकेदारांनी अंमलात आणली आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या पावसाने पालिकेच्या गटार सफाई कामाचे पितळ उघडे पाडले आहे. आयुक्तांसह अधिकारी नाले, गटार सफाईची कामे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरत नसल्याने त्याचा गैरफायदा ठेकेदार घेत आहेत.