कल्याण – कल्याण पूर्व शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह एकूण नऊ जणांची शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिवसेना पक्षातून हकालपट्टी केली. शिवसेना पक्ष, महायुतीच्या विरोधात काम करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे आणि मनमानी पध्दतीने कारभार असा ठपका हकालपट्टी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहरप्रमुख महेश गायकवाड, विशाल पावशे, सुशीला माळी, रोहित डुमने, मनोज बेळमकर, शंकर पाटील, प्रशांत बोटे, शरद पावशे, राजू भाटी, विद्या कुमावत यांचा समावेश आहे. महेश गायकवाड खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक मानले जात होते. मागील दोन वर्षापासून खासदार शिंदे यांच्या पाठबळामुळे कल्याण पूर्वेत महेश गायकवाड आक्रमकपणे नागरी समस्यांची सोडवणूक आणि विकास कामे मार्गी लावण्याच्या विषयावर काम करत होते.

महेश गायकवाड यांच्या हालचालींमुळे माजी आमदार गणपत गायकवाड नाराज होते. या हालचालींना शिवसेनेचे वरिष्ठ पाठबळ देत असल्याचा माजी आमदार गणपत गायकवाड यांना संशय होता. त्याची परीणिती नंतर गणपत गायकवाड यांनी महेश यांच्यावर गोळीबर करण्यात आली. या घटनेनंतर गणपत गायकवाड आणि महेश यांच्याबरोबर काही महिने कल्याण पूर्वेत शिवसेना-भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला.आपल्या खास समर्थकांवर भाजप आमदाराने गोळीबार केल्याने शिंदे शिवसेनेतील वरिष्ठ नाराज होते.

हेही वाचा >>> स्नेहा पाटील यांच्या बंडखोरीनंतर गोदामांवर कारवाई

आपल्यावर गोळीबार झाला. त्यामधून आपण सुखरूप बाहेर पडलो, हा आपला पुनर्जन्म आहे, या विचारातून महेश गायकवाड पाच ते सहा महिन्यांपासून कल्याण पूर्वेत धडाडीने काम करत आहेत. कल्याण पू्र्वेत भाजपने कोणालाही उमेदवारी दयावी त्याचे आपण काम करू, गणपत गायकवाड यांच्या घरात उमेदवारी दिली तर आपण विरोधात काम करू असे उघड आव्हान महेश यांनी शिवसेनेसह भाजप नेत्यांना दिले होते.

कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड यांच्या निमित्ताने भाजपची हुकमत असल्याने भाजपने कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. त्यानंतर महेश यांना खा. डाॅ. शिंदे यांच्यासह वरिष्ठांनी खूप समजविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मनात गोळीबाराची सल असल्याने त्यांनी भाजपकडील सत्तास्थानाला न घाबरता आणि शिवसेनेच्या वरिष्ठांच्या सल्ल्याला न जुमानता कल्याण पूर्वेत आपण निवडणूक लढविणारच अशी भूमिका घेऊन शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. ते नंतर पक्षनेत्यांच्या आदेशावरून अर्ज मागे घेतील, असा अंदाज वर्तविला जात होता. त्याला महेश गायकवाड यांनी जुमानले नाही. त्यामुळे पूर्व भागात महायुतीच्या सुलभा गायकवाड यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा >>> पाणी नाही तर मत नाही; अंबरनाथमध्ये पाण्यापासून वंचित मतदार बहिष्कारच्या भूमिकेत

महेश यांना शिवसेनेतील नाराज गट साथ देत असल्याने त्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. कल्याण पूर्वेतून शिंदे शिवसेनेतर्फे इच्छुक असलेले विशाल पावशे बंडखोरी करून वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढवित आहेत. शिंदे शिवसेनेच्या बंडखोरांमुळे कल्याण पूर्वेत महायुतीच्या सुलभा गायकवाड यांची डोकेदुखी वाढली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan east shinde shiv sena city chief mahesh gaikwad including nine expelled from shiv sena zws