कल्याण – कल्याण पूर्व शिंदे शिवसेना शहरप्रमुखपदी नीलेश शिंदे यांची तर, विधानसभा प्रमुखपदी प्रशांत काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

कल्याण पूर्व शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करून महायुतीच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरुध्द उमेदवारी दाखल केला. त्यांना समज देऊनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नुकतीच शिंदे शिवसेनेच्या शहरप्रमुख पदावरून महेश गायकवाड यांची हकालपट्टी केली होती.

Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Eknath Shinde : “काहीजण आमदारकी वाचवण्यासाठी…”, उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Neelam gorhe statement about ram shinde in Legislative Council hall is viral
नीलम गोऱ्हे राम शिंदेंना म्हणाल्या, “आता तुम्हाला मागच्या दाराने….”
Ram Shinde Elected as Legislative Council Chairperson
Ram Shinde : “राम शिंदे सर, क्लास कसा चालवायचा हे…”, विधानपरिषद सभापतीपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांची टिप्पणी, सभागृहात हशा!
Eknath Shinde
Eknath Shinde On RSS : “संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात…”; आरएसएस मुख्यालयात पोहचताच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
nagpur winter session, Eknath shinde, uddhav thackeray
नागपूर : उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी हास्यास्पद, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “जेलमध्ये टाकू अशी… “

हेही वाचा >>>राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया

विधानसभा निवडणूक सुरू असल्याने स्थानिक पातळीवर पक्ष नेतृत्व करण्यासाठी शहरप्रमुखाची गरज असल्याने जिल्हाप्रमुख लांडगे यांनी नीलेश शिंदे यांना शहरप्रमुख पदी, प्रशांत काळे यांना विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीची पत्रे दिली. शहरप्रमुख नीलेश शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशांत काळे राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाटयाला गेल्याने त्यांनी शांत राहणे पसंत केले.

‘माजी नगरसेवक असताना शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागात आपण अनेक विकास कामे केली. या माध्यमातून आपला लोकांशी थेट संपर्क आहे. नवीन जबाबदारी आपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याने पक्ष संघटना वाढविणे आणि ती अधिक मजूबत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत,’ असे शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader