कल्याण : कल्याणमध्ये राहत असलेल्या एका २९ वर्षाच्या तरूणीची तमीळनाडूतील पेंंदुराई येथील एका २९ वर्षाच्या तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. मागील चार वर्षापासून हा तरूण तरूणीला आपण लग्न करू, असे सांगून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करत होता. या तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले म्हणून तरूणीने बुधवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात तरूणा विरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फसवणूक झालेली तरूणी व्यावसायिक आहे. या तरूणीची ओळख व्यवसायाच्या माध्यमातून चार वर्षापूर्वी तमीळनाडू येथील एका २९ वर्षाच्या तरूणा बरोबर झाली. नियमितच्या बोलण्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. तरुणाने तरुणीला ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. आपण लग्न करू,’ असे वेळोेवेळी सांगितले. तरूणाच्या बोलण्यावर तरूणीने विश्वास ठेवला. विवाह होणार असल्याने तरूणाने पीडित तरुणीला गोवा येथील हाॅटेलमध्ये दोन वेळा, त्यानंतर तरूणीच्या कल्याणमधील घरी येऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तरूणीने तरूणाच्या या कृतीला वेळोवेळी विरोध केला. आपण विवाह करणार आहोत, असे तरूण तरूणीला सांगत होता.

हेही वाचा : ठाणे महापालिकेने आखला शंभर दिवसांचा कार्यक्रम, कार्यालयीन कामकाज, ऑनलाईन सेवा सज्जता आणि स्वच्छता मोहिमेवर भर

आपल्या इच्छे विरुध्द तरूणाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केले म्हणून पीडित तरूणीने खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी तरूणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. घस्ते याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan girl sexually abused by a youth from tamil nadu with the lure of marriage css