कल्याण – कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना समाज माध्यमातून आठ गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी बुधवारी देण्यात आली आहे. या धमकी प्रकरणाने खळबळ उडाली असून महेश यांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून धमकी देणाऱ्या दीपक कदम नावाच्या इसमाचा शोध सुरू केला आहे.

दीपक कदम या इसमाने समाज माध्यमातून धमकी देताना म्हटले आहे की, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी तुला चार गोळ्या घातल्या होत्या. मी आठ गोळ्या घालीन. ज्या राजकीय लोकांच्या जीवावर उड्या मारत आहेस, त्यांचे आता राजकारणातील स्थान काय आहे ते समजून जा. तुला आता शंभर टक्के ठार मारणार एवढे लक्षात घे’.

arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
CM Eknath Shinde on Arvind Sawant Statement about Shaina NC
CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Sharmila Shinde
…आणि बॉम्ब हातात फुटला; शर्मिला शिंदेने सांगितला किस्सा, म्हणाली, “मी थरथरत…”
Shrikant Eknath Shinde candid speech regarding Kalyan Gramin decision
कल्याण ग्रामीणचा निर्णय वरिष्ठांचा ! खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती
mumbai polcie arrested 20 year old youth for threatening Zeeshan Siddiqui and actor Salman Khan
झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक
Zeeshan Siddique and actor Salman Khan threatened
Zeeshan Siddique-Salman Khan threatened : झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खानला धमकी

गेल्या पाच महिन्यापूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात स्वताच्या रिव्हाॅल्व्हरमधून गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये महेश यांचे समर्थकही गंभीर जखमी झाले होते. कल्याण पूर्वचा आमदार होण्यासाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे महेश गायकवाड यांना चढ देत आहेत. यामुळे ते आपल्या प्रत्येक कामात अडथळा आणून आपणास त्रास देत आहेत, असा समज आमदार गायकवाड यांनी केला होता.

हेही वाचा >>> घोडबंदर मार्ग ठप्प; घाटरस्त्याच्या कामामुळे वाहनांच्या रांगा

या त्रासाप्रकरणी आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारींची कोणीही दखल घेत नव्हते. आता आपणास न्याय मिळणेही कठीण आहे. आणि महेश यांचा गणपत गायकवाड यांच्या विकास कामे, खासगी कामांमध्ये हस्तक्षेप वाढू लागला होता. या सततच्या जाचाने आमदार गणपत गायकवाड त्रस्त होते.

अशाच एका जमिनीच्या प्रकरणात समझोता करण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात फेब्रुवारीमध्ये एकत्र जमले असताना आमदार गायकवाड यांनी रागाच्या भरात महेश यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळ्या घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात महेश सुदैवाने बचावले. आता आमदार गायकवाड या गुन्ह्याप्रकरणी तळोजा कारागृहात आहेत.

हेही वाचा >>> ठाणे : १४ जागांवर महायुतीचा वरचष्मा, विधानसभेच्या तीन जागांवर महाविकास आघाडीचे तर, एका जागेवर अपक्षाचे वर्चस्व

महेश यांच्यावर एका विकासकाने दोन महिन्यापूर्वी खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी फरार

आमदार गायकवाड यांनी तीन महिन्यापूर्वी आपल्यावर गोळीबार केला होता. त्या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत. त्या गु्न्ह्यातील आरोपींचे नाव घेऊन आपणास धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करावी यासाठी आपला पाठपुरावा आहे. या प्रकरणात काही राजकीय दबाव येत आहे. धमकी प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रर केली आहे, असे महेश यांंनी सांगितले. महेश गायकवाड यांची तक्रार प्राप्त झाली आहे. गु्न्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, असे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले.