कल्याण – कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांना दोन दिवसापूर्वी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या दीपक भीमसेन कदम (५४) या इसमाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मानसिक बिघडलेली स्थिती आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमधून आपण हा प्रकार केला आहे, अशी कबुली आरोपी प्रकाश यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना दिली आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी दीपक कदम या इसमाने फेसबुक समाज माध्यमातून एका मोठ्या लघुसंदेशाव्दारे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांंना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या धमकीपत्रात महेश यांना असलेल्या राजकीय पाठबळाचा उल्लेख करण्यात आला होता. कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील गोळीबाराचे प्रकरण ताजे असताना, आता हे नवीन धमकी प्रकरण चर्चेला आले होते.

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
maharashtra assembly election 2024 chief minister eknath shinde criticizes on manifesto of maha vikas aghadi
”महाविकास आघाडीचा जाहीरनामा ही पंचसूत्री नसून थापासुत्री”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका!
Kalyan, Dombivli rebels, Kalyan, Dombivli, campaigning,
कल्याण, डोंबिवलीतील बंडखोरांचे पाठीराखे प्रचारातून गायब; बंडखोर, अपक्षांचा एकला चलो रे मार्गाने प्रचार
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा…कपिल पाटील यांच्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून तरूणाची आत्महत्या, शहापूरमधील घटना

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तातडीने याप्रकरणाचा तपास करून गुरुवारी धमकी देणाऱ्या दीपक कदम या इसमाला अटक केली होती. या इसमाची पोलिसांंनी कसून चौकशी केली. त्यामध्ये तो मद्यपी असल्याचे, त्याची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि त्याची मानसिक स्थिती बिघडलेली असल्याचे आढळले. याऊलट प्रकाश हा महेश गायकवाड यांंचा फेसबुक मित्र असल्याचे तपासात पुढे आले. आपल्या बिघडलेल्या मानसिक स्थितीमधून हा प्रकार घडला आहे, अशी कबुली प्रकाशने पोलिसांना दिली.

हेही वाचा…घोडबंदर मार्गवर आज सायंकाळपासून कोंडीमुक्ती, घाट रस्त्याचे काम पूर्ण होणार

या प्रकारात तथ्य नसल्याचे दिसून आल्यावर त्याला योग्य ती समज देऊन पोलिसांनी त्याची सुटका केली. महेश गायकवाड यांनाही या प्रकरणाची पोलिसांनी माहिती दिली आहे.