कल्याण : मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानका जवळ सोमवारी सकाळी चाकरमान्यांच्या कामावर जाण्याच्या पहिली दिवशी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कसारा, कर्जतकडे जाणारी लोकल सेवा पूर्ण विस्कळीत झाली. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली. अनियमित वेळेने लोकल धावत होत्या. इंडिकेटरवर शून्य वेळ लावण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकात कोणती लोकल, कधी येणार याची कोणतीही माहिती प्रवाशांना मिळत नव्हती. रेल्वेकडून फक्त सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती दिली जात होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवार कामावर जाण्याचा पहिलाच दिवस. त्यात लोकल सेवेत गोंधळ उडाल्याने प्रवासी संतप्त झाले होते. यामध्ये महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी सर्वाधिक अस्वस्थ होते. अनियमित वेळेत असलेली एखादी लोकल कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात आली की अगोदर प्रवाशांनी तुडुंब भरून आलेल्या या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत होती. कसारा, कर्जतकडे जाणारे नोकरदार, भाजीपाला विक्रेते स्थानकांमध्ये अडकून पडले होते.

हेही वाचा…डोंबिवली ‘एमआयडीसी’त बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट

रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने थोडी उसंत घेतल्याने फलाटावरील प्रवासी निश्चिंत होते. बहुतांशी सर्वच रेल्वे स्थानकातील फलाटांवर रेल्वेने निवार वाढविणे, रूंदीकरण, नवीन जिन्याची कामे केली आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये पावसाच्या पाण्याची गळती लागत आहे. फलाटावरही प्रवाशांना छत्री घेऊन, रेनकोट घालून उभे राहावे लागते.

सोमवारी सकाळी कल्याण, डोंबिवली, कोपर, विठ्ठलवाडी, टिटवाळा, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात गेलेल्या बहुतांशी प्रवाशांनी अर्धा ते एक तास लोकल येत नाही पाहून काहींनी रस्ते मार्गाने ओला, उबर, खासगी वाहनाने तर काहींनी घरी जाणे पसंत केले. लोकल सेवेतील गोंधळामुळे रस्ते मार्गावरील वाहतुकीत वाहनांची भर पडली होती.

हेही वाचा…धर्मवीर- २ चित्रपटातील संवादावरून आनंद दिघे यांचे पुतणे संतापले; म्हणाले, “शिंदे स्वत:ला…”

गेल्या महिनाभरातील अशाप्रकारे लोकल सेवा विस्कळीत होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी भांडुप परिसरात रेल्वे मार्गात पाणी तुंबल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan signal malfunction disrupts central railway services causes chaos for monday commuters psg