लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : राज्य सरकारी मध्यवर्ति संघटनेच्या आदेशावरून विविध मागण्यांसाठी गुरूवारपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाल्याने या कार्यालयातील ग्राहक सेवेचे कामकाज ठप्प झाले आहे.

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Pune Municipal Corporation takes action after stray dog ​​attack
भटक्या श्वानांच्या हल्ल्यानंतर महापालिकेने उचलले हे पाऊल!
Pune Municipal Corporations sealed 27 properties in 18 days
महापालिकेची कामगिरी १८ दिवसात केल्या २७ मिळकती सील!
contract workers, contract workers water supply department , fate of 1,800 contract workers ,
१८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात, काय आहे कारण?
Kalyan Dombivli Municipal corporation, Construction Regularization Application ,
‘कडोंमपा’तील बांधकाम नियमितीकरणाचे अर्ज प्रलंबित असलेल्या इमारतींना दिलासा
Pedestrian Day Pune , Lakshmi Road Pune ,
एका दिवसात पुणे महापालिकेने केली लाखोंची उधळण..! नक्की कशासाठी खर्च केले पैसे

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना नुतनीकरण, नवीन वाहन परवाना, प्रशिक्षण कामासाठी कल्याण, डोंबिवलीसह शहापूर, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ भागातून आलेेले नागरिक कामकाज ठप्प असल्याने परत गेले.

आणखी वाचा-ठाणे : आईच्या आजारपणावर उपाय म्हणून मुलीचे संशोधन

कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन कर्मचारी संघटनेचे कल्याण विभाग अध्यक्ष सुधाकर कुमावत, सरचिटणीस पावबा कंखर, कार्याध्यक्ष सचीन तायडे, मार्गदर्शक बळीराम कांबळे, शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना कल्याणचे अध्यक्ष नरेंद्र सांगळे यांच्या नेतृत्वाखाली, आरटीओ कार्यालया बाहेर निदर्शने केली. शासनाने आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. जुनी निवृत्ती वेतन योजना सुरू करा, सरकारी सेवेचे कंत्राटीकरण रद्द करा, सरकारी नोकर भरतीवर बंदी उठवा, अशा अनेक मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Story img Loader