कल्याण : कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली भागात एका हल्लेखोर तरूणाने तलवार हातात घेऊन एका तरूणाचा पाठलाग करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीला आली आहे. ही दृश्यचित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरूण बिनधास्तपणे हातात तलवारी घेऊन वावरत असल्याने त्यांना पोलिसांचा धाक आहे की नाही, असे प्रश्न नागरिक करत आहेत. याप्रकरणी आर्यन पाटील आणि त्याच्या चार साथीदारांविरुध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रारदार सत्कार भोईर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सत्कार भोईर थोडक्यात या हल्ल्यातून बचावला आहे.

हे ही वाचा…Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency : एकनाथ शिंदेंविरोधात कोण लढणार? मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महासंग्राम रंगणार!

आर्यन पाटील याने एका वाहनाला धडक देऊन वाहनातील प्रवाशांना जखमी केले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. साक्षीदार म्हणून सत्कार भोईर याने आर्यन पाटीलसह त्याच्या इतर साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली होती. सत्कारमुळे आपली नावे पोलिसांना समजली. त्यामुळे पोलिसांनी आपल्याला आरोपी केल्याचा राग आर्यन आणि त्याच्या मित्रांना आला होता. ते सत्कार भोईरला याप्रकरणी जाब विचारणार होते. पण सत्कार त्यांच्या तावडीत सापडत नव्हता.

हे ही वाचा…“अक्षय शिंदे चकमकीचा लवकरच उलगडा करेन”, वकिलांनी उभा केला चकमकीचा प्रसंग

शुक्रवारी सत्कार घराबाहेर पडल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावरून जात होता. त्यावेळी त्याच्यावर पाळत ठेऊन असलेल्या आर्यन पाटीलने सत्कारला पाहताच त्याचा हातात तलवार घेऊन त्याला मारण्याच्या उद्देशाने पाठलाग सुरू केला. सत्कारने तात्काळ तेथून पळ काढल्याने तो थोडक्यात बचावला.
खडकपाडा पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. आर्यनने तलवार कोठूुन आणली. याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan west youth chasing youth with sword in his hand and trying to kill him caputured in cctv sud 02