कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका तरूणीने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणात पोलिसांनी सात महाविद्यालयीन तरूण, एक तरूणी अशा आठ जणांविरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तरूणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मयत तरूणी आणि तिची मैत्रिणी, सात इतर मित्र असा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक ग्रुप होता. सात तरूण, एक तरुणी मिळून मयत तरुणीला विविध कारणाने त्रास देत होते. या तरुणीच्या साधेपणाचा गैरफायदा घेत तरूणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अत्याचाराच्या अश्लील चित्रफिती तरूणांनी तयार केल्या होत्या. या चित्रफिती समाज माध्यमावर प्रसारीत करण्याची धमकी या आठ जणांकडून तरूणीला सारखी देण्यात येत होती. यामुळे ही तरूणी अस्वस्थ होती, असे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले.

अश्लील चित्रफिती समाज माध्यमात प्रसारीत झाल्या तर आपली, कुटुंबाची बदनामी होईल. घरात हा प्रकार समजला तर आपणास कुटुंबाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भीती या तरूणीला होती. त्यामुळे नैराश्य आलेल्या या तरूणीने काटेमानिवली येथील राहत्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन उडी मारून आत्महत्या केली.

सोसायटीच्या आवारात मोठ्याने आवाज झाल्याने रहिवासी बाहेर आले. त्यावेळी त्यांना तरूणीने आत्महत्या केल्याचे समजले.
या प्रकरणात कुटुंबीयांच्या माहितीवरून पोलिसांनी सात तरूण, एका तरूणीविरुध्द मानसिक त्रास देणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे कायद्याखाली आरोपी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.