कल्याण डोंबिवलीच्या  महापौर कल्याणी पाटील यांच्यावर गुरूवारी महात्मा फुले पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांला शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमेश हनुमंते यांनी हा गुन्हा दाखल केला. पालिका हद्दीतील अंगणवाडी सेविकांना मानधन, वेतनश्रेणी विषयावरून आपण पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे अनेक सेविका आपल्या राष्ट्रवादीच्या संघटनेत दाखल झाल्या आहेत. यापूर्वी अंगणवाडी सेविकांचे नेतृत्व शिवसेचे नगरसेवक कैलास शिंदे करीत होते. त्यामुळे पाटील यांनी शिंदे यांच्या मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार हनुमंते यांनी केली.

Story img Loader