लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: कृत्रिम बध्दिमत्तेचा सामाजिक भावनेतून वापर करुन आपल्या जवळील ज्ञान अधिकाधिक सामान्य, गुणवानांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न कल्याण मधील कृत्रिम बुध्दिमत्तेमधील (एआय) तज्ज्ञ कासम शेख करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन मायक्रोसॉफ्ट कंपनीने कासम शेख यांना जगातील काही मोजक्या कृत्रिम बुध्दिमत्ता तज्ज्ञांमध्ये ‘सर्वोच्च विशेषज्ञ व्यक्ती म्हणून सन्मानित केले आहे.

अशाप्रकारचा पुरस्कार कासम यांना मायक्रोसॉफ्टकडून सलग दुसऱ्यांदा मिळाला. जगातील १०४ माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञांपैकी भारतामधील चार कृत्रिम बुध्दिमत्ता तज्ज्ञांना हा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रातून कासम हे एकमेव या सन्मानासाठी पात्र ठरले. मागील वर्षी भारतातून ‘एआय’ तंत्रज्ञानातील पुरस्कार मिळविणारे कासम हे पाचवे आणि महाराष्ट्रातील एकमेव मानकरी होते. मागील वर्षी जगातील ‘एआय’ क्षेत्रातील मोजक्या १४१ विशेषज्ञांना हा पुरस्कार मिळाला होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या तज्ज्ञांना हा पुरस्कार दिला जातो.

आणखी वाचा- डॉक्टरकडून गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; बदलापुरातील प्रकार, आरोपी अटकेत

गेल्या आठवड्यात मायक्रोसॉफ्टने आपल्या संकेतस्थळावरुन जगातील १०४ कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तज्ज्ञांची पुरस्कारासाठी नावे जाहीर केली. त्यात कासम यांचा समावेश आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान देश, महाराष्ट्रातील शिक्षण, आरोग्य, निवडणूक विभाग, सामान्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सेवासुविधांसाठी अधिक् प्रभावीपणे कसे वापरता येईल. शासनाकडून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांसाठी या तंत्रज्ञानाचा अधिक उपयोग कसा करता येईल, यादृ्ष्टीने विशेषज्ञ कासम शेख प्रयत्नशील आहेत. या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. राज्याच्या निवडणूक विभागातील वरिष्ठांनी दोन वेळा कासम यांना निवडणूक कामासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा कोणत्या पध्दतीने उपयोग करता येईल यादृष्टीने चर्चा केली आहे.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकता जिना, उद्वाहक बंद राहत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

कासम कॅपजेमिनी या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष, ऑनलाईन माध्यमांतून ते ‘एआय’ तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. प्रत्येक समस्या, तक्रार ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बैठ्या जागी कशी सुटेल यादृष्टीने कासम प्रयत्नशील आहेत. वरच्या पातळीपासून ते तळागाळापर्यंत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा अधिक वापर करुन लोकांचे जीवन सुकर होईल यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे कासम यांनी सांगितले. कासम यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानावर चार पुस्तके लिहिली आहेत. समाज माध्यमांतून ते ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या दृश्यध्वनीचित्रफिती उपलब्ध करुन देत आहेत. आपल्या या कार्याची दखल मायक्रोसॉफ्टने घेऊन आपण दुसऱ्यांदा या पुरस्काराचे मानकरी ठरलो, असे कासम यांनी सांगितले.