स्वत:च्याच कुटुंबातील १४ जणांची निर्घृण हत्या करण्यापूर्वी हसनैनने त्यांना खाण्यातून गुंगीचे औषध दिल्याची माहिती आता समोर येत आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या प्राथमिक अहवालानुसार, जेवणानंतर सगळ्यांनी जो फालुदा खाल्ला होता, त्यामध्ये हसनैनने क्लोझॅपिन हे स्क्रिझोफेनियावरील औषध मिसळलं होतं. त्यामुळे हसनैन सुऱ्याने वार करत असताना गुंगीत असलेल्या कुणालाही जाग आली नाही, असे चाचणीत निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, या सगळ्याचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे.
शेजारच्या अल्तमशमुळे सुबिया वाचली
काही दिवसांपूर्वी पोलिसांना हसनैनच्या शय्यागृहात डीपाकोटी आणि स्किझोफीन ही स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) या आजारावरील दोन औषधे सापडली होती. त्यामुळे हसनैन मनोरुग्ण होता का या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता. हसनैनने १४ जणांची सुऱ्याने गळा चिरून हत्या करत असताना हसनैनला इतरांकडून प्रतिकार होऊ शकला नाही. त्यामुळे या हत्येमागचे गूढ आणखी वाढले होते.
फालुद्यात गुंगीचे औषध मिसळून हसनैनने केली सर्वांची हत्या
हसनैनने १४ जणांची सुऱ्याने गळा चिरून हत्या करत असताना हसनैनला इतरांकडून प्रतिकार होऊ शकला नाही
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-03-2016 at 16:18 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasarvadavali mass murder case hasnain warekar gave soporific drug to his family