कल्याण- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी पालिकेने अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत या योजनेची अंमलबजाणी केली जाणार आहे. चालू कर, यापूर्वीचा दंड आणि व्याज अशी एकत्रित रक्कम करदात्याने भरल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

हेही वाचा >>> ठाणे महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी पदी डॉ. चेतना नितील के यांची नियुक्ती

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

मागील दहा वर्षाच्या काळात मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेने वेळोवेळी महसुली वसुलीचा भाग आणि करदात्यांना कर भरण्यासाठी सोयीचा मध्यम मार्ग म्हणून अभय योजना राबविल्या आहेत. गेल्या दोन वर्षाच्या काळात करोना महासाथीत पालिकेचे उत्पन्न घटले होते. त्यावेळी या योजनेची अंमलबजावणी प्रशासनाने केली होती. या योजनेला नागरिकांसह विकासकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ही योजना पुन्हा लागू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. या योजनेची पुन्हा अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आयुक्त डाॅ. दांगडे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> कचऱ्यातील टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर करण्यासाठी कडोंमपात १० संकलन केंद्रे

करदात्याने संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराच्या मागणीची दंड, व्याजासहची २५ टक्के रक्कम एक रकमी भरल्यास त्याला ७५ टक्के शास्ती रक्कम माफ केली जाणार आहे. १५ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत हा कर भरणा करणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मागील अनेक वर्षाची मालमत्ता कराची सुमारे अठराशे कोटीची रक्कम थकबाकीदारांकडे आहे. वाणीज्य कराची सर्वाधिक थकबाकी आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट, कौटुंबिक वादात अडकली आहेत. प्रशासनाला कर वसुली करताना अडथळा येतो. अभय योजनेतून सुमारे २०० ते २५० कोटीचा महसूल मिळेल, असा विश्वास आयुक्त दांगडे यांनी व्यक्त केला.