३१ जुलैच्या आत मालमत्ता कराची रक्कम भरणा करणाऱ्या नागरिकांना पालिका पाच टक्के सवलत देते. पालिकेतील ऑनलाईन सेवेतील तांत्रिक अडचणी, नागरिकांचा सवलतीमुळे कर भरण्याचा उत्साह पाहून प्रशासनाने ३१ जुलै ऐवजी सवलतीत कर भरणा करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात जे नागरिक कराची वर्षभराची रक्कम एक रकमी भरणा करतात त्यांना पालिका पाच टक्के करात सवलत देते. ही सवलतीची रक्कम पुढील कर देयकात वळती करुन नागरिकांना त्याचा लाभ मिळतो. यावेळी पालिका संगणकीकरणाच्या ऑनलाईन सेवेत तांत्रिक बिघाड असल्याने नागरिकांना ऑनलाईन कर भरणा करताना, कर भरण्याची पावती मिळताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी कर भरण्याची मुदत वाढविण्याची पालिकेकडे केली होती. अनेक सोसायट्यांचा लाखो रुपयांचा कर भरणा असतो. ते ही या सवलतीचा सर्वाधिक लाभ घेत असतात.
नागरिकांची मागणी आणि पालिकेतील तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने ३१ जुलै ऐवजी ३१ ऑगस्टपर्यंत नागरिकांना सवलतीत कर भरणा करण्याची सुट दिली. नागरिकांनी ऑनलाईन पध्दतीने कर भरणा करावा. तेथे अडचणी आल्या तर पालिका नागरी सुविधा केंद्रात स्थळ उपस्थितीत रोख, धनादेशाने कर भरणा करावा, असे पालिका मालमत्ता कर विभागाने केले आहे.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
Supreme Court decision regarding credit card payments print eco news
क्रेडिट कार्ड देयकाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; थकबाकीचा भरणा उशिराने केल्यास वार्षिक ३० टक्के व्याजदराची मर्यादा रद्दबातल
direct tax collection
प्रत्यक्ष कर संकलनातून केंद्राच्या तिजोरीत १५.८२ लाख कोटींचा महसूल
Kalyan Dombivli Municipal corportion,
कल्याण : तीन महिन्यांत ५७५ कोटीच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान
Only 6 68 percent of the country population pays income tax
देशात इन्कम टॅक्स भरणारे केवळ ६.६८ टक्केच ; निम्म्याहून अधिकांचा शून्य करभरणा!

मालमत्ता कर विहित वेळेत भरणा केला नाही तर दोन टक्के प्रतिमहा व्याज आकारले जाते. त्यामुळे मालमत्ता कर विहित वेळेत भरणा करुन नागरिकांनी पालिका सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Story img Loader