कल्याण – मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सवांबरोबर घरगुती गणपतींचे शांततेत विसर्जन व्हावे यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शहरांमधील २३ विसर्जन मिरवणूक मार्गांवर १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियोजन पालिका आणि पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २९३ सार्वजनिक गणपती आहेत. ४३ हजार ८०७ घरगुती गणपती आहेत. गेल्या अकरा दिवसाच्या कालावधीत दीड दिवसाचे, अडीच, पाच आणि सात दिवसांचे गणपती अशा एकूण २० हजाराहून घरगुती गणपतींचे विसर्जन झाले आहे. गणेश भक्तांना वाहन कोंडीचा त्रास न होता आपल्या घराच्या परिसरात गणपती बाप्पाचे विसर्जन करता यावे यासाठी पालिकेने कल्याणमध्ये तिसगाव नाका, गावदेवी मंदिर, चिंचपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाणे, बारावे मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, डोंबिवलीत ठाकुर्ली येथील पंचायत बावडी, नेहरू मैदान, अयोध्या नगरी, शिवम रुग्णालय घरडा सर्कल जवळ, टिळकनगर विद्यामंदिर, दत्तनगर प्रगती महाविद्यालय, कस्तुरी प्लाझा, न्यू आयरे रस्ता, मोठागाव उदंचन केंद्र, आनंदनगर, भागशाळा मैदान येथे कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे.

pimpri traffic police cctv camera surveillance
नियम मोडताय सावधान! ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून वाहनचालकांची तपासणी; तीन कोटी दंड वसूल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
thane forest department, thane district shahpur tehsil, Katkari tribe families
२६०० कातकरी कुटुंबांचा घराचा प्रश्न वनविभागाच्या हाती ! वनविभागाच्या जागांना गावठाणाचा दर्जा मिळण्याबाबत प्रतीक्षा
Thane Lake, Thane Lake wetland Survey,
तलावांच्या ठाण्यात चारच पाणथळांचे सर्वेक्षण, ठाणे शहरातील चार ठिकाणांची पाणथळ क्षेत्रात नोंद
PMP bus pune, PMP bus accident risk,
पुणेकर सावधान! रस्त्यांवरून धावताय मृत्यूचे सापळे, प्रवाशांचा जीव धोक्यात?
Pune , construction department Pune,
पुणे : बांधकाम विभाग झाला ‘सतर्क’, थांबविली १०५ प्रकल्पांची कामे, नक्की काय आहे प्रकार ?
Raigad School CCTV , CCTV , Raigad School,
रायगड : शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे प्रस्ताव पुढे सरकेना, साडेसहा कोटींचा खर्च अपेक्षित
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची लवकरच यांत्रिकी पध्दतीने साफसफाई, चार यांत्रिक वाहनांची खरेदी

गणपती विसर्जनासाठी एकूण ६८ विसर्जन घाट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ३७ ठिकाणे डोंबिवलीत, कल्याणमध्ये २७ आहेत. शहराच्या वेगळ्या भागात, विसर्जन मार्गांवर एकूण ८०० पोलीस आणि दोन राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत, असे पालिका, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

विसर्जन स्थळी प्रखर झोताचे दोन हजार ७३५ दिवे, ७० जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी १०३ वीजेचे दिवे असलेले मनोरे उभारण्यात आले आहेत. १८० सीसीटीव्ही विसर्जन मिरवणूक मार्गांवर नजर ठेवणार आहेत.

रस्ते बंद

अनंत चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी दुपारी १२ ते गणपती विसर्जन होईपर्यंत कल्याणमधील दुर्गाडी पुलावरील, डोंबिवलीतील माणकोली पुलावरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे. मंगळवारी सहजानंद चौक, आधारवाडी चौक, उर्दू हायस्कूल, दुर्गामाता चौक, लालचौकी भागातील रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यास वाहतूक विभागाने प्रतिबंध केला आहे.

हेही वाचा >>> कल्याण जवळील शहाड येथे जुन्या भांडणातून  कुटुंबाला ठार मारण्याची तरूणाची धमकी

भिवंडी कोन भागातून दुर्गाडी पुलावरून येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने वाडेघर चौक, आधारवाडी चौकातून इच्छित स्थळी जातील. शिळफाटा, पत्रीपूलकडून येणारी सर्व हलकी वाहने गोविंदवाडी वळण रस्त्याने दुर्गाडी पुलावरून इच्छित स्थळी जातील.

दुर्गाडी किल्ल्याजवळ दुर्गा माता चौकात विसर्जन मिरवणुकांमुळे वाहन कोंडी झाल्यास सर्व वाहने गांधारी पूल मार्गे येवई नाका येथून पडघा नाका येथे सोडण्यात येतील. कल्याण शहरातील वाहने येवई नाक्याकडून इच्छित स्थळी जातील, असे वाहतूक विभागाने जाहीर केले आहे.

एस. टी. महामंडळ, खासगी बसना दुर्गाडी ते शिवाजी चौकमार्गे वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. भिवंडीकडून येणाऱ्या बस गोविंदवाडी वळण रस्त्याने वल्लीपीर रस्ता येथून शहरात येतील. मुरबाड रस्त्याने येणाऱ्या बस बिर्ला महाविद्यालय, दुर्गाडी, गोविंदवाडी वळण रस्ता येथून कल्याणमध्ये येतील. या बसना प्रेम ऑटो येथे प्रवेश बंद केला आहे. विसर्जनामुळे माणकोली पूल मंगळवारी दुपारी १२ ते गणपती विसर्जन होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे शहरांमधून अंजूरदिवे, माणकोली, लोढाधाम येथून येणाऱ्या वाहनांना माणकोली गाव येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने भिवंडी वळण रस्त्याने इच्छित स्थळी जातील. डोंबिवली शहरातून माणकोली पुलाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना कोपर उड्डाण पूल, ठाकुर्ली उड्डाण पूल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

Story img Loader