कल्याण– घर, इमारत परिसरातील मोकळ्या जागांमध्ये पालिकेच्या बाजार परवाना विभागाची परवानगी न घेता दररोज किंवा आठवड्यातील ठराविक दिवशी विविध वस्तु विक्रींचा बाजार भरविणाऱ्या मालक, चालकांना पालिकेच्या बाजार परवाना विभागाने नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईने खासगी बाजार चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कल्याणमधील महालक्ष्मी हॉटेलजवळील लक्ष्मी बाजारातील गौतम शहा, वसंत व्हॅली येथील शंकर म्हात्रे यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती एका पालिका अधिकाऱ्याने दिली.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
Chirbil program of entertainment in Dombivli
डोंबिवलीकर किलबिल कार्यक्रमाची पोलिसांच्या १०० क्रमांकावर तक्रार
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत अनेक जमीन, इमारत, घर मालकांनी आपल्या वास्तुच्या परिसरातील मोकळ्या जागांमध्ये फरीवाले, भाजीविक्रेते, इतर गृहपयोगी वस्तु, सवलतीच्या दराने वस्तु विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्या आहेत. असे बाजार भरविण्यापूर्वी जागा मालकांनी पालिकेच्या बाजार परवाना विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. या माध्यमातून पालिकेला महसुल मिळतो. हा महसुल बुडविण्यासाठी बाजार मालक पालिकेकडून अशाप्रकारची परवानगी न घेता खुलेआम दररोज, आठवड्यातील काही दिवस मोकळ्या जागेत बाजार भरवत असल्याचे पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांच्या निदर्शनास आले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या व्यवस्थापकाची तडकाफडकी उचलबांगडी, व्यवस्थापक सक्तीच्या रजेवर

उपायुक्त गुळवे यांच्या आदेशावरुन बाजार परवाना विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी आपल्या पाहणी पथकासह कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील मुरबाडकर गेस्ट हाऊस जवळील लक्ष्मी बाजारात गुप्तरितीने पाहणी केली. तेथील विक्रेत्यांकडे पालिका परवान्याविषयी विचारणा केली. अशाप्रकारचा परवाना आमच्याकडे नाही. आम्ही मालक गौतम विजय शहा यांच्या आदेशावरुन याठिकाणी व्यवसाय करतो, अशी उत्तरे अधिकाऱ्यांना दिली.

अशीच पाहणी अधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅलीमधील वृंदावन सोसायटी आवारातील खासगी बाजाराची केली. तेथे शंकर म्हात्रे जागा मालक विनापरवाना बाजार भरवित असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती साहाय्यक आयुक्त ठाकुर यांनी उपायुक्त गुळवे यांना दिली. खासगी जागा मालक महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ३७६, ३७६(अ), ३७७, ३७८, ३८३, ३८६ नुसार विना परवानाग वस्तुंचा साठा करणे, वस्तुंना विक्री व्यवसायाला नियमबाह्य जागा उपलब्ध करुन देणे, पालिकेची परवानगी न घेता विना परवाना व्यवसाय करणे कायद्याने गुन्हा आहे. उपायुक्त गुळवे यांच्या आदेशावरुन खासगी बाजार भरविणाऱ्या गौतम शहा, शंकर म्हात्रे यांना पालिकेने नोटीस बजावली आहे.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर विकासाचे प्रकल्प राजकीय इच्छाशक्ती अभावी बारगळले?

नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत व्यवसाय परवान्यासाठी आवश्यक मालमत्ता कर भरल्याची पावती, जमीन मालकीची कागदपत्रे विहीत नमुन्यात बाजार परवाना विभागाकडे दाखल करावीत, अन्यथा आपल्या विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तंबी नोटिसीत देण्यात आली आहे.

कल्याण, डोंबिवली शहराच्या अनेक भागात जमीन मालकांनी धोकादायक इमारती पाडून तेथील मोकळ्या जागेत बाजार भरविण्याचा धंदा सुरू केला आहे. “पालिका हद्दीत बाजार परवाना विभागाची परवानी न घेता खासगी बाजार चालविणाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. अशा खासगी बाजार चालविणाऱ्यांना शोधुन त्यांना नोटिसा देऊन बाजार परवाना घेण्यासाठी बंधनकारक केले जाईल. ही प्रक्रिया पार न पाडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.” वंदना गुळवे – उपायुक्त, बाजार परवाना विभाग.