मालमत्ता करवसुलीसाठी कडोंमपा आता कठोर पावले उचलणार
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने मालमत्ता तसेच इतर करांच्या वसुलीसाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाय आखण्यास सुरुवात केली आहे. येत्या आर्थिक वर्षांअखेरीस तिजोरीत पुरेशी रक्कम जमा व्हावी यासाठी मालमत्ता कर थकविणाऱ्यांच्या मालमत्तावर टाच आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एवढेच नव्हे तर घरातील टीव्ही, फ्रीज, वॉशींग मशिन यांसारखे साहित्यही जप्त केले जाऊ शकते, असा इशारा मालमत्ता कर विभागाने दिला आहे.
जकात आणि त्यापाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था कर बंद झाल्यामुळे महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. स्थानिक संस्था करामुळे महापालिकेच्या तिजोरीत दर महिन्याला सुमारे २० ते २५ कोटी रूपयांची भर पडत होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार, दैनंदिन खर्चाची कामे करणे प्रशासनाला शक्य होते. मागील काही महिन्यांपासून ‘एलबीटी’ बंद झाल्याने पगारासह दैनंदिन खर्च भागविणे प्रशासनाला अवघड झाले आहे. मालमत्ता, पाणी कर ही महापालिकेची महसुली उत्पन्नाची साधने आहेत. पाणी देयक वसुलीत दरवर्षी सुमारे १५ ते २० कोटी रूपयांचा तोटा होतो. चालूवर्षी मालमत्ता कराचे २६२ कोटीचे लक्ष्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी सगळय़ा प्रकारचे थकीत कर वसुली करण्याचे आदेश नवनिर्वाचित महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने मालमत्ता कर थकबाकीदारांकडे मोर्चा वळवला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा