डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात अद्ययावत आगार, रिक्षा वाहनतळ व शॉपिंग मॉल
रिक्षा, खासगी वाहने आणि पादचाऱ्यांच्या वर्दळीमुळे नेहमीच कोंडीने गजबजलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील पूर्व आणि पश्चिम परिसराला मोकळा श्वास घेता यावा यासाठी महापालिकेने या भागात बहुद्देशीय संकुलाच्या उभारणीचा प्रस्ताव तयार केला आहे. दिवस-रात्र होणाऱ्या कोंडीमुळे या भागातून वाहने चालविणे अवघड झाले आहे. अनेक वर्षांपासूनची ही कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने डोंबिवली पूर्वेत इंदिरा चौक ते बाजीप्रभू चौक दरम्यान बहुद्देशीय संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संकुलात आगार, वाहनतळ तसेच महापालिकेची कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याशिवाय डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाला खेटून असलेल्या मासळी बाजाराची पुनर्बाधणी करून या ठिकाणी संकुल उभारले जाणार आहे.
डोंबिवली पूर्व, पश्चिम भाग कोंडीमुक्त करण्यासाठी महापालिकेने या संपूर्ण परिसराचा विकास आराखडा तयार केला आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली. या आराखडय़ानुसार डोंबिवली पूर्व भागात इंदिरा चौकात असलेली महापालिकेची दुमजली इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे. महापालिकेला लागून असलेल्या सहकार भांडार व खासगी जमीनमालकांच्या संमतीने महापालिका कार्यालय ते बाजीप्रभू चौक दरम्यान आठ माळ्यांचे प्रशस्त बहुद्देशीय संकुल उभारण्यात येणार आहे. खासगी ठेकेदारांच्या सहभागातून हे संकुल उभारण्यात येणार आहे. या संकुलाच्या भुयारी भागात प्रशस्त वाहनतळ, त्यावर केडीएमटीचे आगार, तळमजल्याला व्यापारी गाळे, पहिल्या माळ्यावर सहकार भांडार, हॉटेल व्यावसायिकासाठी जागा, शॉपिंग मॉल, तिसऱ्या व चौथ्या माळ्याला वाहनतळाची सुविधा ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच्या माळ्यांवरील जागा पालिकेची प्रभाग कार्यालये, सभागृह यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. महापालिकेला कायमस्वरूपी महसुलाचा स्रोत सुरू राहील हा या बहुद्देशीय प्रकल्पामागील उद्देश आहे, असे घरत यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी पालिकेने गेल्यावर्षी सुमारे सव्वा कोटीची तरतूद केली आहे. विष्णुनगर पोलीस ठाणे हे या भागातील वाहतूक कोंडीचे मुख्य कारण होऊन बसले आहे. त्यामुळे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे मोठागाव परिसरातील महापालिकेच्या जागेत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रस्तावातील तरतुदी..
महापालिका कार्यालय, इंदिरा चौक ते बाजीप्रभू चौक दरम्यान प्रशस्त जागा सध्या उपलब्ध आहे. या जागेचा सुयोग्य वापर करून कोंडी सोडविणे हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश आहे.
बाजीप्रभू चौकातील नव्याने उभ्या राहत असलेल्या पाटकर संकुलामधून महापालिकेला वाहनतळाची जागा उपलब्ध होणार आहे. पी. पी. चेंबर्स मॉलमधील वाहनतळ, तेथील पडीक जागांचा वापर करण्यात येणार आहे.
बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, चिमणी गल्ली परिसरात वाहनतळांची सुविधा उपलब्ध झाल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर, गल्लीबोळात उभी राहत असलेली दुचाकी वाहने वाहनतळावर उभी राहतील.
बाजीप्रभू चौकात रस्ते अडवून उभ्या राहत असलेल्या केडीएमटीच्या बस बहुद्देशीय संकुलातील आगारात उभ्या राहणार असल्याने वाहतूक कोंडीचा मुख्य प्रश्न मार्गी लागणार आहे.
डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगरमधील मासळी बाजाराची इमारत बहुद्देशीय पद्धतीने उभारून तेथेही मासळीबाजार, दुचाकी, चारचाकी वाहनतळ, व्यापारी गाळे असा नव्याने विचार करण्यात येणार आहे.