कल्याण-डोंबिवली शहराची अवस्था अत्यंत बकाल झाली असतानाही महापालिका प्रशासन रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा विल्हेवाट आदी नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. नागरी समस्यांकडे लक्ष न देता डोंबिवलीतील रामनगरमधील पुसाळकर उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी तब्बल ५२ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांनी त्याल कडाडून विरोध केला आहे. साडेपाचशे नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन नव्या आयुक्तांना देण्यात आले असून, ही उधळपट्टी थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
रामनगर प्रभागातील पुसाळकर उद्यान गेल्या सात वर्षांपूर्वी महापालिकेने लाखो रुपयांचा खर्च करून सुशोभित केले आहे. या उद्यानात जॉगिंग ट्रॅक, कट्टे, बाकडे, मनोरंजनाची व्यवस्थाही आहे. आता महापालिकेने या उद्यानात अ‍ॅम्पिथिएटर, पदपथ, सुशोभित प्रवेशद्वार, हिरवळ आदी कामांसाठी ५२ लाख ९२ हजार रुपये मंजूर करून या कामाचा ठेका देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पुसाळकर उद्यानापासून हाकेच्या अंतरावर सहा कोटी खर्च करून पाच वर्षांपूर्वी आनंद बालभवन उभारण्यात आले आहे. तेथे अ‍ॅम्पिथिएटर असताना पुन्हा तेथून हाकेच्या अंतरावर नव्याने अ‍ॅम्पिथिएटर कशासाठी, असे प्रश्न करीत नागरिकांनी या उधळपट्टीला विरोध केला आहे. माधव आचार्य, डॉ. प्रकाश देशमुख आदी ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना एक निवेदन देण्यात आले आहे.
उद्यानाचा सर्वाधिक वापर ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, महिला करतात. मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे एकमेव उद्यान आहे. अशा परिस्थितीत अ‍ॅम्पिथिएटर, पदपथ बदलून मैदानाचे रूप घालवण्याचा हा डाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
संरक्षित भिंत, पदपथ, कट्टा या कामांसाठी ३० लाख ४८ हजार रुपये, सुशोभित प्रवेशद्वारांसाठी ८ लाख, झाडझुडपांच्या लागवडीसाठी १४ लाख ४४ हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. उद्यान आहे त्या स्थितीत ठेवा या मागणीसाठी सुमारे ५५० नागरिकांनी मंगळवारी उद्यानात सह्यांची मोहीम राबवली. करदात्या जनतेचा पैसा अशाप्रकारे उधळपट्टी करून दिला जाणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅम्पिथिएटरचा निर्णय रद्द : मनसे नगरसेविकेची माहिती
उद्यानाला चांगले स्वरूप येण्यासाठी ते सुशोभित करण्यात येणार आहे. स्थानिक संस्थांना कार्यक्रम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून अ‍ॅम्पिथिएटरची संकल्पना राबवण्यात येणार होती. नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन हे थिएटर रद्द करण्यात येत आहे. त्या बदल्यात चांगली सुविधा तेथे देण्यात येईल, अशी माहिती मनसेच्या रामनगर विभागाच्या नगरसेविका कोमल पाटील यांनी दिली. दरम्यान, नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेचे उपक्रम राबवले जातात. पुसाळकर उद्यानात कोणत्या प्रकारच्या सुविधा पाहिजेत. या विषयी नागरिकांनी एक निवेदन दिले आहे. त्यांच्या सुचनांचा विचार करून उद्यानात सुशोभिकरणाचा प्रकल्प राबवण्यात येईल. जॉगिंग ट्रॅक उद्यानाच्या कडेला ठेवला की मधला भाग क्रिकेट खेळण्यासाठी वापरला जातो. हा विचार करून सुशोभिकरणाची आखणी करण्यात आली आहे. सुशोभिकरणाची निविदा प्रक्रिया यापूर्वीच करण्यात आली आहे. वरिष्ठांशी बोलून सुशोभिकरणाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले.