डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर फ आणि ग प्रभागाने सोमवारपासून संयुक्त कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत वर्दळीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी केलेली पक्की आसनव्यवस्था घणांच्या घावांनी तोडून टाकण्यात आली. रेल्वे स्थानक भागातील रस्ते पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे राहतील अशा पध्दतीने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील दीडशे मीटरच्या आतील फेरीवाले मागील काही दिवसांपासून फक्त हटविले जात होते. रेल्वे स्थानक भागातील फ प्रभागातील फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, पाटकर रस्ता, बाजीप्रभू चौक हे रस्ते फेरीवाला हटाव पथकातील कामगारांच्या आशीर्वादाने फेरीवाल्यांनी गजबजून गेलेले असायचे.

New road from private land to exit Virar station platform
विरार फलाटावरून बाहेर पडण्यासाठी खासगी जागेतून नवीन रस्ता; अडथळ्यातून प्रवाशांची सुटका
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Western Railway has clarified that air conditioned local trains will continue to operate from Bhayandar railway station
८:२४,ची लोकल वातानुकूलितच ,आंदोलनानंतरही रेल्वे प्रशासन ठाम
Trials underway to launch Amrut Bharat Express from Pune on four routes in North India Pune print news
पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
badlapur khopoli trains news
बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक
mmrda planning to build a creek bridge from kasarvadavali to kharbav in bhiwandi
ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार

हेही वाचा >>> कल्याणमधील गोविंदवाडी रस्त्यावरील लोखंडी सळ्या निघाल्याने भीषण अपघाताची भीती

फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथक प्रमुख भगवान पाटील यांच्या आशीर्वादाने हे फेरीवाले डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात बसत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. पूर्व भागातील नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, फडके रस्ता, पाटकर रस्ता भागातून नागरिकांना चालण्यासाठी रस्ते नसयाचे. फेरीवाल्यांनी पदपथ, रस्ते अडवून ठेवल्याने नागरिकांची कोंडी होत होती. याविषयी ‘लोकसत्ता’ने बातमी देताच वरिष्ठांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली.

उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी सोमवारी संयुक्तपणे कारवाई करून फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, टाटा लाईन मानव कल्याण केंद्र, कस्तुरी प्लाझा ते शिवमंदिर रस्ता परिसर फेरीवाला मुक्त केले. अचानक ही कारवाई सुरू झाल्याने ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. फेरीवाला हटाव पथकातील बहुतांशी फेरीवाला पथक प्रमुख हे सफाई कामगार आहेत. ते राजकीय आशीर्वादाने फेरीवाला हटाव पथकात मलई मिळते म्हणून या पथकात वर्णी लावून घेत असल्याचे समजते.

हेही वाचा >>> ठाणे: घोडबंदर मार्गासह उड्डाणपुलावर पुन्हा खड्डे, सेवा रस्त्यांचीही दुरावस्था

ह प्रभागातील सफाई कामगार दिलीप भंडारी यांनी साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांना शिवीगाळ केली होती. तरीही राजकीय आशीर्वादामुळे प्रशासन अद्याप भंडारी यांच्यावर कारवाई करत नसल्याचे समजते. सफाई कामगारांनी मूळ आस्थापनेत दाखल व्हावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देऊन अधिकारी थंड बसत असल्याने फेरीवाला हटाव पथकातील सफाई कामगार सुशेगात आहेत.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सर्व वर्दळीच्या रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पदपथांलगत फेरीवाल्यांनी उभारलेले ठेले, मंच तोडून टाकण्यात आले आहेत. फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई यापुढे नियमित सुरू राहील. या कारवाईत हयगय करणाऱ्या फेरीवाला हटाव पथकातील कामगारांवर कठोर कारवाई केली जाईल. भारत पवार साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.

Story img Loader