कल्याण: येत्या काही महिन्यात कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या विद्युत बस, रिक्षा भाडेदर, इंधन खर्च, वाढती दळणवळण स्पर्धा विचारात घेऊन मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) मंजुरी नंतर कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने आपल्या बस सेवा भाडेदरात सुसुत्रता आणली आहे. यामध्ये सामान्य, वातानुकूलित बसमधून प्रवाशांना माफक दरात प्रवास करण्यास मिळेल असे नियोजन नवीन भाडेदर सुसुत्रतेत करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> ठाणे: शिंदे गटाला आणखी एक धक्का; माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी शिवबंधनात

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

बहुतांशी प्रवासी नोकरी, कामासाठी ५० किमीच्या आत दररोज प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांना भाडे वाढीचा चटका नको म्हणून ५० किमी पुढील भाडे दरात वाढ करण्यात आली आहे. ५० किलोटमीटर पुढील टप्प्याच्या प्रवासासाठी पाच रुपये वाढीव भाडे, तर .याच किमीसाठी वातानुकूलित बससेवेसाठी वाढीव १० रुपये आकारण्यात येणार आहेत, अशी माहिती केडीएमटीचे परिवहन उप व्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली. केडीएमटी परिवहन उपक्रमाच्या भाड्यात सुसुत्रता येण्यासाठी परिवहन उपक्रमाने एक प्रस्ताव पाच वर्षापूर्वी मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाली. केडीएमटी प्रशासनाने शनिवार (ता.१२) सुधारित भाडेदर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर परिवहन उपक्रमांच्या तुलनेत वातानुकूलित बसचा भाडे दर ४५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : अजित पवारांच्या नाराजीमुळे सत्तेची समीकरणं बदलणार? ; वाचा राज्यभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी

सामान्य प्रवाशालाही वातानुकूलित बस मधून प्रवास करता यावा हा विचार तिकीट दरात सुसुत्रता करताना करण्यात आला आहे. सामान्य बससाठी तिकीट भाड्यात ५० टक्के सवलतीचे भाडे राहिल. ५० किमीच्या पुढे चार किमी अंतरासाठी किंवा त्याच्या पुढील टप्प्यासाठी वातानुकूलित बस सेवेसाठी १० रुपये वाढीव भाडे आकारण्यात येणार आहे. येथेही प्रौढ तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत असणार आहे. प्रवाशा जवळील सामानावर आकारण्यात येणाऱे भाडे प्रौढ भाड्याच्या समतुल्य असणार आहे, असे भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक

बळकटीकरणासाठी सुसुत्रता

इंधन दरवाढ, कर्मचारी वेतन खर्च, समांतर रिक्षा व इतर अवैध प्रवासी वाहतुकीचा मोठा परिणाम केडीएमटी बस वाहतुकीवर होतो. यामुळे केडीएमटी आर्थिक संकटात आहे. पालिका प्रशासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर परिवहन उपक्रमाचा गाडा सुरू आहे. आर्थिक संकटात असलेल्या केडीएमटीच्या ताफ्यात १४० बस आहेत. सामान्य १०० आणि वातानुकूलित १० बस प्रवासी वाहतुकीसाठी सोडण्याचे परिवहनचे प्रयत्न आहेत. परंतु, आर्थिक गणितामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होत नव्हते. यासाठी भाडे दरात सुसुत्रता येण्यासाठी डिसेंबर २०१८ मध्ये केडीएमटीने एक प्रस्ताव मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन विभागाकडे दाखल केला होता. बेस्टने मुंबईतील भाडेवाढ कमी केल्याने केडीएमटीचा प्रस्ताव अडगळीत पडला होता. मार्च मध्ये केडीएमटीने नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या धर्तीवर प्रस्ताव तयार करुन तो शासनाला सादर केला होता. या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात मंजुरी मिळाली. त्यामुळे माफक दराचे प्रवाशांचे स्वप्न साकार होणार आहे.

गारेगार प्रवास

सध्या वातानुकूलित बसमधून पहिल्या टप्प्यात दोन किमी अंतरासाठी एका प्रवाशाला १५ रुपये भाडेदर आहे. नवीन तिकीट भाडेदर पाच रुपयांनी कमी करुन १० रुपये करण्यात आला आहे. ४५ किमी अंतरासाठी वातानुकूलित बससाठी सध्या प्रति प्रवासी १३५ रुपये मोजावे लागत होते. नवीन भाडे दरात हे भाडे ६५ रुपये कमी करण्यात आले आहे. म्हणजे प्रवाशाला आता ७० रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे, असे भोसले यांनी सांगितले.

” केडीएमटीने प्रवासी भाडयातील सुसुत्रतेसाठी एक प्रस्ताव एमएमआरटीएला पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीची कार्यवाही आयुक्त, परिवहन व्यवस्थापक यांच्या आदेशावरुन केडीएमटी शनिवार पासून करत आहे. माफक दरातील प्रवासाचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा.”

संदीप भोसले, परिवहन उपव्यवस्थापक केडीएमटी.