कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमातील बसचालक वसंत शिंगोटे यांचा गुरुवारी रात्री बस चालवताना भोवळ येऊन मृत्यू झाला. भोवळ येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री त्यांना मृत घोषित करण्यात आले.

बस वाहतूक कोंडीत अडकली होती. त्याच वेळी गाडीतील बॅटरीचा स्फोट झाला आणि ती बंद पडली. ही माहिती नियंत्रण कक्षाला देत असताना शिंगोटे यांना चक्कर आली आणि ते कोसळले.

गणेश मंदिर ते चिंचपाडा रस्त्यावरून गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता शिंगोटे बस चालवत होते. वाहतूक कोंडीमुळे बसची गती संथ होती. बस एकाच ठिकाणी बराच वेळ उभी राहिल्याने बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे बस तिथेच अडकली. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर

पडली. या वेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या खासगी वाहनचालकांनी चालक आणि वाहकांसोबत वाद घातला. हा सर्व प्रकार सुरू असताना शिंगोटे यांनी बस बंद पडल्याची माहिती बस वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. त्याच वेळी त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले.

Story img Loader