प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने डोंबिवली ते पनवेल दरम्यानच्या बस फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या मार्गावर दोन फेऱ्यांमध्ये बस सोडण्यात येत होत्या. या फेऱ्यांमध्ये आणखी तीन फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती साहाय्यक परिवहन व्यवस्थापक संदीप भोसले यांनी दिली.

हेही वाचा>>>उद्या कल्याण-डोंबिवली बंद; ‘सुषमा अंधारेंना कल्याण-डोंबिवलीत पाय ठेऊन देणार नाही’

करोना महासाथीच्या काळात कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने डोंबिवली ते पनवेल बससेवा बंद ठेवली होती. प्रवाशांच्या वाढत्या मागणी नंतर या मार्गावर दोन वर्षांनी दोन बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. वाढत्या प्रवासी संख्येच्या प्रमाणात या बस फेऱ्या अपुऱ्या आहेत, अशी तक्रार सातत्याने प्रवाशांकडून परिवहन व्यवस्थापनाकडे केली जात होती. काही प्रवासी संघटना डोंबिवली ते पनवेल बस फेऱ्या वाढवाव्यात म्हणून प्रशासनाकडे प्रयत्न करत होत्या.

हेही वाचा>>>वारकरी संप्रदायाकडून उद्या ठाणे बंदची हाक; बाळासाहेबांची शिवसेना, भाजप आणि हिंदूत्वादी संघटनांचा बंदला पाठींबा

कसारा, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी परिसरातील अनेक प्रवासी डोंबिवलीतून पनवेल प्रवास करण्याला प्राधान्य देतात. लोकल सेवा आणि अंतराच्या दृष्टीने डोंबिवली ते पनवेल बस प्रवास सुखकारक असल्याने प्रवासी या बससेवेला प्राधान्य देतात. दोन फेऱ्यांच्यामधून काही महिन्यांपासून डोंबिवली ते पनवेल प्रवासी सेवा दिली जात होती. या फेऱ्या वाढत्या प्रवासी संख्येला अपुऱ्या होत्या. प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन केडीएमटी प्रशासनाने अधिक महसूल देणाऱ्या पनवेल मार्गावर वाढीव तीन बस फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकातून या बस सोडण्यात येणार आहेत, असे साहाय्यक परिवहन व्यवस्थापक भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा>>>कल्याण : तुरुंगातून सुटल्यानंतरही गुन्ह्यांची मालिका कायम

पनवेल परिसरातील कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी कामावरुन परण्यासाठी पाच ते आठ वेळेत या बससेवा उपलब्ध असाव्यात अशी प्रवाशांची मागणी आहे. राज्य परिवहन महामंडळाची डोंबिवली पनवेल बस सेवा सुरू आहे. पनवेलला जाण्यासाठी पुरेशा बस फेऱ्या नसल्याने प्रवासी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातून शिळफाटा कल्याण फाटा तेथून रिक्षा, खासगी वाहनाने तळोजा फाटा आणि तेथून रिक्षेने पनवेलकडचा प्रवास करतात. हा प्रवास महागडा आहे. त्यामुळे प्रवासी अधिक बस फेऱ्या पनवेल दिशेेने सोडण्याची मागणी करत आहेत.

“ डोंबिवली-पनवेल बस सेवा सुरू आहे. यापूर्वी दोन फेऱ्यांमधून ही सेवा दिली जात होती. आता या बस फेऱ्यांमध्ये केडीएमटीने तीन बस फेऱ्यांची वाढ केली आहे. ”-संदीप भोसले,सहाय्यक परिवहन व्यवस्थापक,केडीएमटी