नवबौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अटकेत असलेली दुय्यम नटी केतकी चितळे हिला गुरुवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती केतकीच्या वकिलांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर समाजमाध्यमावर हिणकस लिखाण केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळे हिला अटक केली होती. तिला याप्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळताच रबाळे पोलिसांनी ॲट्रोसिटीच्या प्रकरणात तिचा ताबा घेतला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केतकी विरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात नवबौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तिला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर केतकीने तिचे वकिल वसंत बनसोडे यांच्या मार्फत जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी या जामीनअर्जावर ठाणे न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला होता. त्यावेळी न्यायाधीशांनी याप्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. गुरुवारी जामीनअर्जावर निर्णय देण्यात आला आहे. त्यानुसार, केतकी चितळे हिला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ketki chitale granted bail in atrocity case arrested bail granted by thane court amy