कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात गेल्या काही दिवसांपासून सोसायटी आवारातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने सोसायटीमधील रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ओला, सुका कचरा दोन ते तीन दिवस एकाच जागी पडून राहत असल्याने भटके श्वान कचऱ्याने भरलेले डबे जमिनीवर पाडून कचरा इतस्त पसरवीत आहेत, अशा तक्रारी सोसायटीतील रहिवाशांनी केल्या आहेत.

सोसायट्यांमधील कचरा सकाळच्या वेळेत उचलणारे खासगी स्वच्छता सेवक यांनी सोसायट्यांमधील ओला, सुका कचरा गोळा जमा केला की ते तो कचरा सोसायटीतील ओला, सुका डब्यांमध्ये ठेवतात. हे ओला, सुका कचऱ्याचे डबे पालिकेच्या घटांगाड्यांच्या माध्यमातून यापूर्वी दिलेल्या वेळेप्रमाणे, वार लावून उचलला जात होता. मागील काही दिवसांपासून सोसायटी आवारात, प्रवेशव्दारावर ओला, सुका कचऱ्याचे डबे ठेऊनही पालिकेकडून कचरा उचलला जात नाही. सोसायट्यांचे डबे कचऱ्याने भरले गेले असल्याने सोसायटीत दररोज जमा होणारा कचरा कुठे ठेवायचा असा प्रश्न सोसायटी चालकांना पडला आहे.

Financial fraud , students , educational institution,
ठाण्यात शैक्षणिक संस्थेकडून २०० हून अधिक विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
traffic jam Katai Karjat State Highway Khoni Nevali village
Video : काटई कर्जत राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरदार, दूर पल्ल्याचे प्रवासी अडकले
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
badlapur tussle between BJP MLA Kisan Kathore and Vaman Mhatre
पाटलांचा बैलगाडा, बदलापुरात होतोय राडा, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून आमदार, माजी नगराध्यक्ष भिडले
illegal godown of mandap materials on reserved plot for educational facility in dombivli
डोंबिवलीत पाथर्ली येथे पालिकेच्या शैक्षणिक सुविधेच्या आरक्षित भूखंडावर मंडप साहित्याचे बेकायदा गोदाम
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
Dombivli Chinchodichapada person spreading terror with was arrested
डोंबिवली चिंचोडीचापाडा येथे सुरा, घेऊन दहशत पसरविणाऱ्या व्यक्तिला अटक

हेही वाचा…डोंबिवलीत कोकणातील दोन जणांकडून हत्ती दंताची तस्करी

खासगी स्वच्छता सेवक दररोज सकाळी सोसायट्यांचा ओला, सुका कचरा जमा करून सोसायटीचे कचरा डबे उपलब्ध नसल्याने सोसायटीच्या एका बाजुला आणून ढीग लावून ठेवत आहेत. सुका कचरा कितीही दिवस राहू शकतो. ओल्या कचऱ्याला एक दिवसानंतर दुर्गंधी सुटते. त्याचा त्रास सोसायटीतील रहिवाशांना होत आहे. सोसायटीच्या मुख्य प्रवेशव्दारांवर पालिकेच्या घंटागाड्यांच्या सोयीसाठी सोसायटीतील खासगी स्वच्छता सेवकांनी कचऱ्याने भरलेले डबे भरून ठेवले आहेत. मागील तीन तीन दिवस घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी फिरत नसल्याच्या तक्रारी खडकपाडा भागातील रहिवाशांनी केल्या आहेत.

कचरा सोसायटीच्या बाहेर राहत असल्याने भटके श्वान कचऱ्याचे डबे जमिनीवर पाडतात. कचऱ्यातील पदार्थ खाताना ते कचरा सोसायटीच्या बाहेर, पदपथ, रस्त्यावर पसरवितात. हा पसरलेला कचरा गोळा करण्यास खासगी स्वच्छता सेवक तयार होत नाहीत. अशा तक्रारी सोसायटी चालकांनी केल्या. कचऱ्यासाठी नवीन डबे किती खरेदी करायचे असा प्रश्न सोसायटी चालकांना पडला आहे. खडकपाडा सारख्या मध्यवर्गियांची वस्ती असलेल्या भागातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने या भागातील रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा…कोकण इतिहास परिषदेचे १४ वे राष्ट्रीय अधिवेशन, डॉ. अरविंद जामखेडकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार

खडकपाडा भागातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराचे काम बंद करण्यात आले आहे. या भागातील कचरा उचलण्याची कामे पालिका कामगारांकडून केली जात आहेत. इतर प्रभागातील स्वच्छता, कचरा उचलण्याची कामे पूर्ण झाली की दुपारनंतर खडकपाडा भागात कामगार कामे सुरू करतात. थोडे दिवस ही पध्दत अंमलात आणली जात आहे. याठिकाणी नियमित दैनंदिन कचरा उचलला जाईल अशी व्यवस्था उभी केली जात आहे. वसंत देगलुरकर मुख्य स्वच्छता अधिकारी, कल्याण.

Story img Loader