डोंबिवली – डोंबिवलीतील बालदोस्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला, मनोरंजन, मौजेचा किलबिल महोत्सव रविवार, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मागील ११ वर्षापासून होणारा हा महोत्सव डोंबिवली पश्चिमेतील बावनचाळीतील रेल्वे मैदानावर होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संध्याकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. हा कार्यक्रम लहान मुलांसाठी मोफत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. डोंबिवली परिसरातील पालक आपल्या मुलांना घेऊन या कार्यक्रमात सहभागी होतात. चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर काढणे, चाकावर मातीच्या मडक्यांसह इतर भांडी तयार करणे, वायरपासून खेळणी तयार करणे, तांदळावर नाव कोरणे, आकर्षक मेंदी काढणे, लाखेपासून बांगड्या तयार करण्याचे कार्यक्रम महोत्सवात आहेत. याशिवाय ड्रामा, जादूचे प्रयोग, जगलरचे प्रयोग पाहण्यास मिळणार आहेत.बोलक्या बाहुल्यांचे जनक रामदास पाध्ये यांचा मुलगा सत्यजित पाध्ये अर्धवटरावांसह बोलगोपाळांबरोबर मौज करण्यासाठी येणार आहेत. इंडियाज गाॅट टॅलेंटमधील रिॲलिटी शो, झिरो डिग्री ग्रुप डान्स यांचाही समावेश कार्यक्रमात आहे. मोहित आणि शौर्य हे भाऊ-बहिण महोत्सवात गाणी गाणार आहेत.

हेही वाचा >>>ठाण्यात वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर पीयूसी तपासणी मोहिम; ८२ वाहनचालकांकडून ८३ हजार रुपयांचा दंड वसूल

हवेत नृत्यकला सादर करणारी शुटिंग स्टार, अल्लाउद्दिनचा जीन, रोली पोली, मिकी माऊस, मिनी जायंट टेडी बेअर, जायंट पांडा, जोकर छोट्या बालगोपाळांबरोबर धम्माल मौज करणार आहेत. स्टिक वाॅकर, मिरर मॅन फेस्टिव्हलचे आकर्षण असणार आहे. कमांडो ब्रिज, रिव्हर क्राॅसिंग, वाॅल क्लायमिंब, सेगवे व्हेईकल्स या कसरतींचे थरार महोत्सवात अनुभवता येणार आहेत. ट्रम्पोलाईन, राॅक हॅमर, जम्पिंग सारखे खेळ किलबिल फेस्टिव्हलमध्ये आहेत. दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी आहे. डोंबिवलीतील लहान मुलांसाठी अधिक संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.