डोंबिवली: बालगोपाळ, बच्चे कंपनीला एक दिवसाची मौजमज्जा, मस्ती करता यावी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रविवारी डोंबिवलीत येथे एक दिवसाच्या किलबिल महोत्सवाचे आयोजन केले आहे. डोंबिवली पश्चिमेतील बावन्न चाळ येथील रेल्वे मैदानावर हा महोत्सव संध्याकाळी चार ते रात्रो १० वेळेत होणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
हेही वाचा >>> ठाणे: शिंदे गटाला आणखी एक धक्का; माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी
दोन वर्ष करोना महासाथीच्या काळात मुले घरात बंदिस्त होती. अशा मुलांना मौज मजा मस्तीचा आनंद घेता यावा म्हणून हा उपक्रम आयोजित केला आहे.गेल्या नऊ वर्षापासून हा महोत्सव आयोजित केला जातो. करोना महासाथीच्या दोन वर्षात हा उपक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. किलबिल महोत्सवात साहसी खेळ, जादुचे प्रयोग, चित्रकला, वायरची खेळणी, वाद्यवादन, जगलर, नाटक,कुंभारकाम, विविध प्रकारचे नृत्य सादरीकरण करण्यात येणार आहे. या महोत्सवातील सर्व सुविधा बालगोपाळांना मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.