डोंबिवली- येथील फडके रस्त्यावरील माॅडर्न कॅफे हॉटेलचे संस्थापक किट्टा उर्फ अण्णा रामा शेट्टी यांचे सोमवारी सकाळी कर्नाटक मधील मंगलोर जवळील शिबरुर गुथ्थू गावी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, अजित, शैलेश ही मुले, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.गाव स्वरुपात असताना किट्टा शेट्टी यांनी ५५ वर्षापूर्वी डोंबिवलीत फडके रस्त्यावर कौलारु घरात सहा बाकडे, मंचकांचा आधार घेऊन माॅडर्न कॅफे हाॅटेल सुरू केले. दाक्षिणात्य पध्दतीचे चवीदार डोसा, इडली वडा, उतप्पा खाद्य पदार्थ ग्राहकांना मिळाले पाहिजेत यासाठी त्यांनी पहिले प्रयत्न केले. तीच चव ५५ वर्षानंतर किट्टा शेठ यांच्या माॅर्डन कॅफे आणि संलग्न साखळीतील हाॅटेलमध्ये ग्राहकांना चाखायला मिळते.

ग्राहक देव भव आणि अन्नाची नासाडी टाळणे ही त्यांची हाॅटेल व्यवसायातील मुख्य सुत्रे होती. ती त्यांनी स्वता पाळली. त्याच बरोबर दोन्ही हाॅटेल व्यावसायिक मुलांना त्याचे काटेकोर पालन करण्यास सांगितले. हाॅटलमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्यास किट्टा शेठ स्वता गल्ल्यावरुन उठून ग्राहकांना पाणी, खाद्य पदार्थ देण्यात पुढाकार घेत होते.माॅडर्न कॅफेमध्ये साहित्यिक, नाटककार, कलाकार यांची वर्दळ असायची. कॅफे एक चावडी होती. साहित्यिक शं. ना. नवरे, आबासाहेब पटवारी, विचारवंत सुरेंद्र बाजपेयी, श्रीकांत टोळ, श्रीकांत पावगी, भालचंद्र कोल्हटकर या जाणत्यांच्या विचार केंद्रात किट्टा शेठ यांची बैठक होती.

malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Yoga Guru Sharath Jois
Yoga Guru Sharath Jois : मॅडोनाचे योग गुरू शरथ जोइस यांचं ट्रेकिंग करताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

हेही वाचा >>>जैतापूर आणि नाणार या प्रकल्पांचा विरोध समजून घेणे आवश्यक; जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर

हेही वाचा >>>देशाबाबत वाईट गोष्टींना जास्त प्रसिद्धी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

बदलत्या काळाप्रमाणे हाॅटेल व्यवसायात बार संस्कृती शिरली. किट्टा शेठ यांनी आर्थिक लालसेसाठी कधीही त्यांनी या संस्कृतीला जवळ केले नाही. किट्टा शेठ यांच्या मुलांची डोंबिवली शहराच्या विविध भागात आठ हाॅटेलची साखळी आहे. तेथे किट्टी शेठ यांच्या पायंड्याप्रमाणे ग्राहक सेवा दिली जाते. विदेशातून आलेला डोंबिवलीकर माॅडर्न कॅफेमधील खाद्य पदार्थ खाल्ल्याशिवाय परतीचा प्रवास सुरू करत नाही. हाॅटेल व्यवसायातील योगदाना बद्दल किट्टी शेट्टी डोंबिवली भूषण पुरस्काराचे मानकरी होते.

(किट्टा शेट्टी.)